आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय कृषी संत्रा महोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड- राज्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,यासाठी कृषी विभाग कृषिमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, एक ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद् घाटन हाेणार असल्याची माहिती आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, हंसराज अहिर, राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी राज्य मंत्री राम शिंदे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आदिवासी मंत्री विष्णु सावरा, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामदास तडस, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्यासह अनेक मंत्री, खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना सतत चार दिवस विविध तंत्रज्ञानाच्या माहितीची मेजवानी मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ. बोंडे यांनी या वेळी दिली. महोत्सवाचा समारोप ऑक्टोबरला होईल. या महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला डॉ. वसुधा बोंडे, नगराध्यक्ष रवी थोरात, जिल्हा माहिती अधिकारी काचावर, शेंदूरजना घाटच्या नगराध्यक्षा सारिता खेरडे, महिला बाल कल्याण माजी सभापती अर्चना मुरुमकर, जयश्री श्रीराव, रमेश देशमुख, सुभाष गोरडे, बाळू मुरुमकर, संतोष निमगरे, विजय श्रीराव, सुरेंद्र आंडे, विवेक फुटाने, देविदास वंजारी, सुनीता डहाके, विनोद कडू, नरेंद्र बेलसरे, प्रभाकर काळे, बंडू काळे, सुधीर बेलसरे, शशिकांत उमेकर, डॉ. अमोल कोहळे, लीलाधर भोंडे, नरेन काकडे, अनंत बिराळे आदी उपस्थित होते.