आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांसाठी डॉ. पठाणांचा सन्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य संचालनलयाच्या अधिका ऱ्यांकडून पुरस्कार स्विकारताना डॉ. पठाण इतर मान्यवर. - Divya Marathi
आरोग्य संचालनलयाच्या अधिका ऱ्यांकडून पुरस्कार स्विकारताना डॉ. पठाण इतर मान्यवर.
महागाव- जिल्ह्यातीलडॉ. जे. एम. पठाण यांनी कुटुंबकल्याण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्य केले. या कार्याची पावती म्हणून त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. शुक्रवारी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. राज्यातून सर्वाधिक कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. त्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

संपूर्ण राज्यातून वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची माहिती आयुक्तांनी मागितली होती. शुक्रवार, ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून पुणे येथे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यातून कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्यांमध्ये महागाव तालुका आरोग्य अधिकारी जे. एम. पठाण यांची संपूर्ण राज्यातून निवड करण्यात आली. सन २०१४ ते १५ या कार्यकाळात सर्वात जास्त कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्याचा मान राज्यात महागाव तालुक्याला मिळाला आहे. प्रजनन बाल आरोग्य राज्यस्तरीय कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाकरिता राज्य कुटुंबकल्याणचे अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. सतीश पवार, माजी महासंचालक डॉ. सोळंके, संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त आय. ए. कुंदन, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे यवतमाळसारख्या जिल्ह्यातील महागावसारख्या छोट्याशा तालुक्यात हे काम झाल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्कारामुळे तालुक्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
दोन वर्षांत दोन हजारांवर शस्त्रक्रिया
महागावयेथील तालुका आरोग्य अधिकारी जे. एम. पठाण यांनी सन २०१४ -१५ मध्ये महागाव येथे एक हजार २०६, उमरखेड तालुक्यामध्ये एक हजार १५९ असे दोन्ही मिळून हजार ३६५ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या. त्यांनी सन २०११ पासून या दोन्ही तालुक्यात हजारांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया आतपर्यंत केल्या आहे.

केलेल्या कामाची पावतीच मिळाली
गेल्याकाही वर्षांमध्ये जिल्ह्यात बऱ्यापैकी कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेबाबत जनजागृती झाली. त्याचमुळे अनेक रुग्णांना जास्त समजावण्याची गरज भासली नाही. हे काम नि:स्वार्थ पद्धतीने केल्यामुळे मी त्यात यशस्वी होऊ शकलो. केलेल्या कामाची पावती म्हणून माझा सत्कार झाला. जे.एम. पठाण, वैद्यकीय अधिकारी.