आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Strike Appealed By Bajrang Dal In Achalpur And Paratwada In Amravati

अचलपुरात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा पहारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंत्यसंस्काराच्या वेळी अमितच्या घराबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. - Divya Marathi
अंत्यसंस्काराच्या वेळी अमितच्या घराबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
परतवाडा- अचलपूर येथील विलायतपुरा येथे वाळू तस्कराच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अमित मोहन बटाऊवाले (वय २१) या युवकावर बुधवारी पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे वडील मोहन बटाऊवाले गंभीर जखमी असून, त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाजिद शे. रहेमान (वय २२) याला पोलिसांनी अटक केली. या घटनेतील आरोपी मो. शहादाद गुल हुसैन (वय २६) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर अमरावती येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेतील इतर पाच हल्लेखोर फरार असून, त्या आराेपींना शोधण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून, चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी बजरंग दलाने अचलपूर-परतवाडा बंदची हाक दिली आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास अमित हा वडिलांसोबत दुचाकीने घरी जात असताना विलायतपुरा येथील पाण्याच्या टाकीजवळ गजानन किराणासमोरील चौकात दुचाकी थांबवत मो. शहादाद गुल हुसैन, नगरसेवक मो. शाकीर गुल हुसैन, मो. वाजिद, मो. आबीर, मो. बादशाह, मो. नाजिद, मो. इशादअली यांनी लाठ्याकाठ्या, कुऱ्हाड, लोखंडी पाइपने हल्ला केला. यात अमितचा मृत्यू झाला, तर मोहन बटाऊवाले मो. शहादाद गुल हुसैन जखमी झाले. घटनास्थळी एमएच२७/आर ३७७ एपी ०४/ एनएफ ७११४ क्रमांकांच्या दोन मोटारसायकली, लोखंडी रॉड, लोखंडी दांडा मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहे.
हा वाद शेती तस्करीतून झाला असून, अमितचे वडील यांनी परिसरात वाळूचे अवैध उत्खनन होत असल्याबाबत जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दिली होती. या तक्रारीत मंडळ अधिकारी तलाठ्याच्या संगनमताने वाळू तस्करीचा व्यवसाय सुरू असल्याचे नमूद केले होते. मोहन बटाऊवाले वाळू तस्करीत बाधा निर्माण करीत असल्याने वाळू तस्करांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. बटाऊवाले यांच्या शेतातून वाळूचे ट्रॅक्टर जात असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत होते. त्यांचा विरोध असतानाही जुमानता शहरातील अनेक वाळू तस्कर वाळू नेत होते. यातूनच हा प्रकार झाला असल्याचे समोर आले आहे. आरोपींमधील काही समर्थांनी मोहन बटाऊवाले हे रेती व्यवसायाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
एकंदरीत हा हल्ला वाळू तस्करीतून झाला असल्याचे बोलले जात आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, विशेष पोलिस महानिरीक्षक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहरात...