आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक सुधारणेसाठी विद्यार्थी आले रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. या कार्यात आपलाही हातभार लागावा या उद्देशाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयातील मॅनजमेन्टला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हातात वाहतूक नियमांचे फलक घेऊन वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. दै. दिव्य मराठीने सुरू केलेल्या अभियानामध्ये या उपक्रमामुळे भर पडली आहे.

शहरात शहराबाहेर अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाहतूक नियमांचे पालन करून वाहन चालविल्यास अपघातांची संख्या निश्चितच कमी होते. त्यामुळे वाहतुकीचे काही महत्वाचे नियम वाहन चालकांनी वाचावे त्याचा अंमल करावा, अशी अपेक्षा करून एम. बी. ए. च्या २५ विद्यार्थ्यांनी हातात फलक धरून शनिवारी (दि. २६)राजकमल चौकात जवळपास दोन ते तीन तास जनजागृती केली. राजकमल चौकात वाहतूक सिग्नल आहे. ज्यावेळी सिग्नलवर लाल दिवा लागतो त्यावेळी एका दिशेची वाहतूक बंद होते. त्यावेळी सदर फलक वाहन चालकाच्या दिशेने घेऊन उभे राहायचे. अशाच पद्धतीने चारही बाजूने हे विद्यार्थी फलक दाखवत होते. यावेळी फलकावर हेल्मेट वापरा, ट्रीपल सिट वाहन चालवू नका अशा प्रकारचे आवाहन करीत होते. अपघातामुळे जीव जातो, अनेकांना अपंगत्व येते, हे नुकसान भरून निघणारे नसते. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे अशी विनंती हे विद्यार्थी करत होते.

अपघातमुक्त सिटीसाठी जनजागृती मोहीम
शहरात शहराबाहेर सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी फलकाद्वारे राजकमल चौकात उभे राहून अपघात टाळण्यासाठी जनजागृतीचा प्रयत्न केला. शंकर पुराणिक, सहायक प्राध्यापक, मॅनेजमेन्ट विभाग, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, अमरावती