आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Get Subsidy On Interest Amount In Educational Loan

शैक्षणिक कर्जामधील व्याज रकमेत मिळणार अनुदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदेशात शिक्षण घेत असलेल्या इतरमागास आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विभाग योजनेअंतर्गत कर्जावरील व्याज रक्कमेत अनुदान योजना चालू करण्यात आली आहे. ही योजना विविध मान्यताप्राप्त पदव्युत्तर आणि पी. एचडी. स्तरावरील शैक्षणिक कर्ज घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे. भारतीय बँक संघटनाच्या सध्याच्या योजनेशी ही योजना जोडली जाणार आहे. नोकरीत असणारा किंवा नोकरीत नसलेल्या उमेदवाराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सर्व मार्गाने वार्षिक उत्पन्न लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्तालयाच्या मागे, इमारत क्रमांक येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.