आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिल सर्जनच्या कक्षात युवक काँग्रेसने दिला तीन तास ठिय्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चुर्णीग्रामीण रुग्णालयाला वाऱ्यावर सोडून गेलेल्या दोषी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिव्हील सर्जनच्या कक्षात तब्बल तीन तास ठिय्या दिला. जोपर्यंत निलंबनाचे लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत याठिकाणावरुन उठणार नाही, अशी गळच कार्यकर्त्यांनी घातली. अखेर सीएस डॉ. अरुण राऊत यांनी १५ दिवसांच्या आत दोषींवर कारवाई केली जाईल असे लेखी पत्र कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर युवक कॉंग्रेसने हे आंदोलन मागे घेतले. १५ दिवसांच्या आत दोषींवर कारवाई झाली नाही, तर यापेक्षाही उग्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. युवक कॉंग्रेसचे सचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

४२ आदिवासी गावांसाठी चुर्णी हे एेकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. याठिकाणी डॉ. कपील सुर्वे हे कुठलीही पूर्वसूचना देता रुग्णालयाला वाऱ्यावर सोडून निघून गेले. अशा बेजबाबदार डॉक्टरमुळे येथील आदिवासी रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागला. सुर्वे यांच्यासोबतच डॉ. सय्यद, डॉ. अब्दुल शेख यांनीही आपली जबाबदारी आेळखली नसल्याचा आरोप युवक कॉंग्रेसने केला आहे. याशिवाय स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली गांजेवर या देखील रुजू झाल्यापासून आल्या नाहीत, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, अधिपरिचारिका अशा अनेक जागा त्वरित भरल्या जाव्यात, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. या आंदोलनात राहूल येवले, गौरव काळे, समीर जवंजाळ, सागर व्यास, आशिष यादव, सागर यादव, पंकज मोरे, विशाल खानझाेडे, संतोष गायन, मुकेश लालवानी, सागर कलाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
डाॅ.राऊत यांच्या कक्षात ठिय्या देऊन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले .
बातम्या आणखी आहेत...