आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळाला निवारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - तालुक्यातील खानापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी शिवहरी ढोक यांच्या कुटुंबाला क्रांतिदिनी म्हणजेच रविवारी (दि. ९) हक्काचा निवारा मिळाला. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेऊन लोकसहभागातून या हक्काच्या निवाऱ्याचे ढोक यांच्या परिवाराला हस्तांतरण केले. या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजु शेट्टी, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकार, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
घरातील कर्त्या पुरुषाने नापिकी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे मुली पत्नी यांना रहायला आश्रय नसल्याची बाब लक्षात येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना तत्काळ ५१ हजारांची मदत करण्यात आली. शिवाय रहायला डोक्यावर छत असावे म्हणून लोकसहभागातून घर बांधून दिले. त्याचे रविवारी या कुटुंबाला स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हस्तांतरण करण्यात आले. मान्यवरांच्या नागरिकांच्या सक्षीने ढोक यांच्या कुटुंबियांनी गृहप्रवेश केला. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
संघटनेच्या कार्याला सलाम
कुटुंबप्रमुखाच्यामृत्यूनंतर ढोक यांच्या कुटुंबाच्या डोक्यावर छत किंवा खायला दाणाही नव्हता. अशात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या मदतीमुळे या कुटुंबाला आधार िमळाला. याबद्दल ढोक कुटुंबीयांनी संघटनेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते याबद्दल उपस्थितांनी खेदही व्यक्त केला.