आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा टेबल टेनिस ३१ पासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - स्व.मणिमोहन ठाकूर स्मृती जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन एचव्हीपीएम इनडोअर स्टेडियममध्ये ३१ जुलै ते आॅगस्ट या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत १० वर्षांखालील मुले मुलींच्या गटापासून ते सिनिअर खेळाडूंपर्यंत सर्वच सहभागी होऊ शकतात.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा सुरू होण्याआधी केले जाते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना सराव मिळवा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच नवोदितांना प्रत्यक्ष सामन्यांचा अनुभव मिळवा, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.
१० वर्षांखालील मिडलवेट गट, १२ वर्षांखालील कॅडेट गट, १४ वर्षांखालील सब-ज्युनिअर गट, २१ वर्षांखालील युथ गट या मुख्य वयोगटांसोबतच शालेय वदि्यार्थी, महावदि्यालयीन वदि्यार्थी कर्मचारी, शहरातील सनिीअर खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. पुढील दोन महनि्यांत आयोजित मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील खेळाडूंना राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. सर्व गटातील विजेत्या उपविजेत्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले जाणार असून विजेत्या उपविजेत्या खेळाडूंना बक्षिस दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जाणार आहे.

प्रवेशाची अंतिम तारीख २७ जुलै असून या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील टेबल टेनिसपटूंनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा टेबल टेनिस संघटनेद्वारे करण्यात आले आहे. एचव्हीपीएम सचिव प्रभाकर वैद्य, संघटनेचे सचिव प्रा. वसंत हरणे, उपाध्यक्ष प्रदीप काळेले, अजय राठी, शरद कासट, पी.डी.देशमुख यांच्या यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. व्ही.एच.हरणे, उपाध्यक्ष प्रदीप काळेले, हमीद खान, शहझाद खान, मिलींद ठाकरे, संजय सस्तकार परिश्रम घेत आहेत. डाॅ. रवींद्रनाथ ठाकूर हे स्पर्धेचे संयोजक असून आंतरराष्ट्रीय पंच हमीद खान मुख्य मंच म्हणून काम बघणार आहेत. सहायक पंच म्हणून शहझाद खान, मिलींद ठाकरे तांत्रिक जबाबदारी सांभाळतील.

उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचा मानस
अमरावतीतून राज्य स्तरावर खेळणारे बरेच टेबल टेनिसपटू घडले आहेत. मात्र राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. या स्पर्धा एकप्रकार ‘टॅलेंट सर्च’साठी उपयोगी ठरतात. अशात जर एखादा दर्जेदार खेळाडू मिळाला तर त्याच्यापासून प्रेरणा घेत नंतर खेळाडूंची फळीच तयार होत असते. आम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवायचेय असे मत सचिव वसंत हरणे यांनी व्यक्त केले.

नवीन खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न
टेबलटेनिस हा खेळ नियंत्रण, कौशल्य, चपळतेसह वेगावर अवलंबून असल्यामुळे जर कठिण असला तरी या खेळात लवकरच नैपुण्य प्राप्त करता येते. स्पर्धेत दरवेळी तेच ते चेहरे दिसतात. या खेळात नवीन प्रतिभांनीही पुढे यावे या दृष्टीने जिल्हा रेटिंग स्पर्धेचे सातत्याने संघटनेतर्फे आयोजन केले जात असते. नवीन खेळाडू घडावेत हाच यामागील प्रयत्न असतो, अशी माहिती हमीद खान यांनी दिली.