आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या अप-डाऊनमुळे विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजुराबाजार - शहरातील विद्यार्थ्यांना सर्व सोई-सुविधा उपलब्ध असल्याने त्यांचा झपाट्याने विकास होत आहे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांवर कार्यरत शिक्षकांना त्याच गावांमध्ये तसेच शाळेपासून विशिष्ट अंतरावर राहण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून बहुतांश शिक्षक शहरात वास्तव्याला आहेत. शिक्षकांच्या रोजच्या अप-डाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थी वाढत्या स्पर्धेत टिकला पाहिजे यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषदेमार्फत गावपातळीवर चालवण्यात येणाऱ्या शाळेतील शिक्षकांना गावामध्येच किंवा शाळेपासून विशिष्ट अंतरावर राहण्याचे आदेश आहेत. त्यांना लागणाऱ्या सुविधाही शासनामार्फत भत्त्याच्या स्वरूपात देण्यात येतात. मात्र, राजुराबाजार परिसरातील अनेक गावांमधील शिक्षक मात्र शासकीय नियमांची पायमल्ली करीत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
शिक्षकांचीमुले खासगी शाळेत : जिल्हापरिषद शाळेत कार्यरत शिक्षकांची मुले मात्र शहरातील खासगी शाळांमध्ये शिकत आहेत. त्यामुळे त्यांना िज.प.शाळांच्या प्रगतीिवषयी आत्मियता नसल्याचे दिसून येते.

शिक्षणाचा बट्ट्याबोळ
ग्रामीणविद्यार्थ्यांना महागडे शिक्षण परवडत नाही. या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून शासन प्रयत्नशील आहे. मात्र, शिक्षका मुख्यालयी राहत नसल्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे. लीलाधर भोंडे, पालक.

आदेशाची पायमल्ली
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळे पाच टक्केही शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. शासनाचा आदेश धुडकावत शिक्षक मनाप्रमाणे वागतात. राहुल बनसोड, पालक.

व्यवस्थापन समिती पाठवते अहवाल
गावातील व्यवस्थापन समितीकडून वर्षातून दाेन वेळा ऑगस्ट फेब्रुवारी या कालावधीत अहवाल पाठवला जातो. शिक्षक गावातच भाड्याने राहत असल्याचा अहवाल व्यवस्थापन समिती पाठवत असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. एन.एम. चाैधरी, गटशिक्षणाधिकारी.
अनेक सुविधांचा लाभ
शिक्षकांनी मुख्यालयी राहण्यामुळे विद्यार्थ्यांचे जे नुकसान होत आहे, त्याबाबत जय गोहत्रे, रवींद्र घाटोळे, रमजान सौदागर या पालकांसह अन्य पालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांना शासनामार्फत भत्ते देण्यात येतात. मात्र, काही शिक्षक गावामध्ये राहत असल्याचे सांगून अतिरिक्त बिल शासनाकडे सोपवून या सुविधांचा लाभ घेत आहेत.

गोरगरीब विद्यार्थ्यांची गोची
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, क्रीडा अशा विविध उपक्रमांवर भर दिला जातो. शासनाने विद्यार्थ्यांचे िहत लक्षात घेता काही नियमावली केल्या आहेत, परंतु शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने गोगरीब विद्यार्थ्यांची गोची होत असल्याचा आरोप केला जात आहे.