आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अासू बनले हसू!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातगेल्या एका दशकानंतर या वर्षी जून रोजी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर एक महिना वरुणराजाची काही कृपा झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे ढग शेतकऱ्यांवर घोंघावत होते. मुख्य पिकं सोयाबीन, तूर, ज्वारी, कापूस, मूग, उडीद या पिकांनी माना खाली टाकल्या होत्या. बहुतेक तालुक्यातील ४० ते ५० टक्के पेरणी वाया गेली. मात्र, आता पुन्हा सुरू झालेला पाऊस ज्यांनी अद्याप पेरणीच केली नव्हती, अशा कास्तकारांसाठी फायदेशीर आहे. काळे ढग बघून मनातील काळे िवचार गळून पडले असून, त्यात आशेची हिरवळ तग धरायला लागली आहे.
शहरातही गेल्या एका महिन्यापासून लोकं उकाड्यामुळे त्रस्त झाले होते. अचानक शनिवारी सायंकाळी रात्री आलेल्या पावसामुळे उकाडा पळाला असून, आल्हाददायक वातावरणाचे आगमन झाले आहे. सकाळी मुले शाळेत जाण्यास तयार असताना पाऊस आल्यामुळे काहींची तारांबळ उडाली. अनेकांना घरात ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट धावपळ करीत बाहेर काढून मुलांना शाळेत पोहोचवावे लागले.

घाटलाडकी : केवळजमीन ओली
दोन दिवस सर्वसाधारण पाऊस झाला. त्यामुळे केवळ जमीन ओली झाली. मात्र, सोमवारी वरुणराजाची हजेरी लागली नाही. फव्वाऱ्यासारखा पाऊस झाला पण त्यामुळे पिके तरारली.
दर्यापूर : आणखी पावसाची गरज

सोमवारीदुपारी १२ वाजता ३० मिनिटे तालुक्यात रिमझिम पाऊस झाला, मात्र हा शेतीसाठी उपयोगी म्हणता येणार नाही. ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणात गारवा पसरला एवढेच.

शिरसगाव कसबा : पिकांनापोषक पाऊस
शिरसगाव कसबा भागात ७० टक्के जमीन ही ओलिताची असल्यामुळे पिकांसाठी हा रिमझिम पाऊस चांगला म्हणता येईल. तसेच ३० टक्के कोरडवाहू शेतीसाठीही लाभदायक आहे.

अंजनगावसुर्जी : पिकांना नवसंजीवनी
रविवारीरात्री रिमझिम पाऊस पडल्यामुळे पिकांना नवसंजीवनी िमळाली, हा पाऊस शेतीसाठी लाभदायक ठरला. तसेच आजवर खोळंबलेल्या पेरण्यांना पुन्हा सुरुवात झाली.
पावसाने दडी मारल्यामुळे केवळ शेतकऱ्यांचीच चिंता वाढली होती असे नाही, तर िपण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, गेले दोन िदवस पाऊस आल्यामुळे जमिनीचा ओलावा वाढला असून, शेतीसोबत हे प्रश्नही सुटतील, अशी आशा वाटत आहे. संदीपराठी, शेतकरी, शिरसगाव कसबा.

मध्य प्रदेश येथून वाहत येणारी नदी चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथून पाच किमी अंतरावर असणाऱ्या मेघा, पूर्णा नदीला जाऊन मिळते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे काही काळ कोरडी पडलेली ही नदी झुळुझुळु वाहू लागली आहे.
गत वर्षी २०जुलैपर्यंतचा पाऊस १८४.४ मिमी
जून ते २० जुलैपर्यंत टक्केवारी ७०.४ टक्के
वर्षभरातीलटक्केवारीपैकीकेवळ २८ टक्के
२० जुलै रोजी ७.३
जून ते २० जुलै २२८.३
तारीख पाऊस जूनते ३० सप्टें. ८१४.५
जून ते २० जुलै ३२४.४
दृष्टिक्षेपात पाऊस
जिल्ह्यात झालेला पाऊस
िजल्ह्यात अपेक्षित पाऊस
बातम्या आणखी आहेत...