आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा लाखांची घरफोडी, पद्मसौरभ कॉलनीमधील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील पद्मसौरभ कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरात चोरट्यांनी सोमवारी (दि.२१) दुपारी चोरी केली. या वेळी चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ४० हजारांची रोख जवळपास साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने, असा सहा लाखांच्या आसपास ऐवज लंपास केला. चोरी झाल्याचे सोमवारी सायंकाळी उघड झाले.

दिनेश ज्ञानदेव पावडे (४२) यांचे पद्मसौरभ कॉलनीमध्ये घर आहे. दिनेश पावडे यांचा व्हील अलायमेंटचा व्यवसाय आहे, तर त्यांच्या पत्नी धामोरी या गावी मुख्याध्यापिका आहे. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पावडे हे त्यांच्या प्रतिष्ठांनामध्ये गेले, तर सौ. पावडे या शाळेत गेल्या. त्यामुळे घर बंद होते. घराला बाहेरून कुलूप लावले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. या वेळी चोरट्यांनी पावडे यांच्या घरातील कपाट तोडले. कपाटात असलेली दोन लाख ४० हजारांची रोख जवळपास १६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.