आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीत पाच घरे खाक, सुरळी येथे शॉर्ट सर्किटमुळे आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - तालुक्यातील सुरळी येथे शुक्रवारी (दि. ४) दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगीमध्ये पाच घरे जळून खाक झालीत. या आगीच्या घटनेमुळे हिवाळ्याच्या िदवसांत पाच कुटुंब उघड्यावर आले आहेत.शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या आगीचा फटका राजेंद्र विठोबाजी पवार, कैलास विठोबाजी पवार, नरेंद्र विठोबाजी पवार, सुनील लक्ष्मण शेळके, संजय लक्ष्मण शेळके यांना बसला असून,त्यांची घरे आगीत भस्मसात झाली आहेत. आग लागली त्यावेळी आनंद पवार (२०) इतर कुटुंबातील लहान मुले घरीच होती. आग लागताच मुलांनी घाबरून घराबाहेर पळ काढल्याने जीवित हानी टळली. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग आटोक्यात येत नसल्याने वरूड शेंदुरजनाघाट येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत पाचही घरे आगीत खाक झाली होती. माहिती मिळताच कामावर गेलेली घरातील मंडळी गावात परतली. संपूर्ण घर संसारउपयोगी साहित्य आगीत राख झाल्याने पवार शेळके कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला आहे. आगपीडित कुटुंबाला ताबडतोब शासकीय मदत देण्यात यावी,अशी मागणी होत आहे.
खाक झालेल्या संसाराकडे हताश नजरेने पाहताना पवार शेळके कुटुंबीय.