आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पाच ठिकाणी चोरी, दोन लाख २१ हजारांचा ऐवज लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातरविवारी एकाच दविशी आयुक्तालयातील तीन पोलिस ठाण्यांमध्ये चोरी घरफोडीच्या पाच घटना दाखल झालेल्या आहे. या पाच ठिकाणांहून चोरट्यांनी दागिने रोख असा जवळपास लाख २१ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. यातील दोन चो-या अवघ्या १५ मिनिटांच्या फरकात नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील चौपाल सागर येथे खासगी बसमधून झालेल्या आहेत.
गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इतवारा बाजारातून मोहम्मद इक्बाल मोहंमद इस्माइल यांच्या रेच्यावरून चोरट्यांनी नऊ हजारांचा एक क्विंटल रुई चोरला आहे. याप्रकरणी रविवारी १२ जुलै रोजी गाडगेनगर पोलिसात तक्रार दाखल आहे. नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील मसानगंजमधील रहिवासी राजेंद्र नारायणदासजी रॉय हे १६ ते २० मे २०१५ रोजी बाहेरगावी गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडून ७० हजारांची रोख चोरलेली आहे. रविवारी तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चौपाल सागर येथे खासगी बसमधील प्रवाशाच्या बॅगमधून सोन्याचे दागनिे लंपास झाले आहे. पिंपळी पुणे येथे राहणारे राजीव पाठक (२८) त्यांच्या पत्नीसह पुण्यावरून मध्य प्रदेशला जाण्यासाठी एका खासगी बसमधून प्रवास करत होते. ही बस रविवारी सकाळी वाजताच्या सुमारास महामार्गावरील चौपाल सागर येथे थांबली. त्या वेळी पाठक दाम्पत्य चहापाणी घेण्यासाठी बसमधून उतरले. त्या वेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगमधील दागिने ११ हजारांची रोख असा ४६ हजार ४७० रुपयांचा ऐवज लंपास केला.