आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा लाख ६५ हजारांची चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजापेठ ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वस्तिकनगरमध्ये एका घरात चोरट्यांनी चोरी करून लाख १७ हजारांची रोख सोन्याचे दागिने असा तब्बल लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही चोरी गुरुवारी (दि. १२) भरदुपारी झाली आहे.

सुभाष शंकरराव निचत यांच्या घरी प्रवेश करून चोरट्यांनी चोरी केली आहे. निचत हे स्वस्तिकनगरमधील एस. के. गुप्ता यांच्याकडे भाड्याने राहतात. गुरुवारी दुपारच्या वेळी निचत हे घराला कुलूप लावून एका नातेवाइकाकडे गेले होते. गुरुवारी सायंकाळीच ते घरी आले. त्या वेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या वेळी चोरट्यांनी निचत यांच्या घरातून १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी, पेन्डॉल, २.५ ग्रॅमचे कानातील, अंगठी या सोन्याच्या दागिन्यांसह लाख १७ हजारांची रोख असा लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. निचत हे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घरून बाहेर पडले होते. सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास ते घरी परतले. याचदरम्यान चोरट्यांनी ही चोरी केली आहे. याप्रकरणी निचत यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत पसरली आहे.