आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोऱ्या थांबता थांबेनात, पुन्हा ११ ठिकाणी चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील पंधरवड्यापासून शहरात चोरीचे सत्र प्रचंड वाढले आहे. यामध्ये घरफोडी, चोरी आणि दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक आहे. दरदिवशी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत किमान पाच ते सहा चोऱ्या होत आहे. हे प्रमाण कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढत आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दिवसभरात आयुक्तालयातील पाच पोलिस ठाण्यांमध्ये अकरा ठिकाणी चोरी झाल्याच्या तक्रार दाखल झाल्या असून, या चोरीमध्ये चोरट्यांनी तब्बल ११ लाख ४६ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अकोली मार्गावरील उषा कॉलनीमध्ये राहणाऱ्या वैभव सुनीलपंत गणोरकर हे भाड्याच्या घरात राहतात. चोरट्यांनी त्यांच्या घरातून हजारांचा मोबाइल ७०० रुपये रोख, असा हजार ७०० रुपयांचा ऐवज मंगळवारी चोरून नेला. बडनेरातील पोटरचाळ भागातील एका महिलेच्या झोपडीला असलेला लाकडी दरवाजा चोरून नेला. त्याची किंमत हजार रुपये आहे. भानखेडा शिवारातील पद्माकर पुंडलिकराव गवई यांच्या शेतातून चोरट्यांनी इलेक्ट्रिक मोटार वायर, असा १७ हजारांचा ऐवज लांबवला. तसेच बडनेरा येथील राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेसाठी गेलेल्या अनिकेत नरेंद्र गुल्हाने या विद्यार्थ्याचा ४० हजारांचा मोबाइल चोरट्याने लंपास केला आहे. या पाचही घटना मंगळवारी घडल्या . कमल कॉलनीमधील निखिल शंकरराव इजापुरे यांचा २४ हजारांचा मोबाइल रस्त्याने जात असताना चोरट्याने चोरून नेला आहे.

कमलेश धनराज बिसेन यांचे कलोतीनगरमध्ये घर आहे. त्यांच्या नातेवाइकांनी घरासमोर उभी केलेली कार (क्रमांक एम. एच. २७ बीई १८००) चोरट्यांनी लाख रुपये किंमतीची लंपास केली. तारांगणनगरमध्ये राहणारे शरद आनंदराव घोंगडे यांचा ५४ हजार ४०० रुपयांचा लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केला आहे. तसेच शोभानगरमधून हृषीकेश प्रमोदराव सातपुते यांची २५ हजार रुपयांची दुचाकी चोरीला गेली आहे. राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील दिवापुरकर ले-आउटमध्ये राहणाऱ्या वैकोम खेयरीफाबा यांचा ३० हजारांचा लॅपटॉप चोरीला गेला आहे. तसेच श्रीविकास कॉलनीमध्ये राहणाऱ्या उमेश दत्तात्रय नवघरे यांच्या घरातून चोरट्यांनी चांदीचे दागिने रोख २० हजार रुपये रोख, असा ३५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

चोरट्यांना आवरण्यात पोलिस यंत्रणा अपयशी
शहरात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या चोरीसत्राला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांना आतापर्यंत यश आले नाही. मागील पंधरा दिवसांत केवळ चोरीच्या तीन दुचाकी जप्त करून दोघांना अटक करण्यातच पोलिसांना यश आले आहे. मात्र, दरदिवशी शहरात चोरटे सर्वसामान्य नागरिकांच्या लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी करत आहेत.

बंदाेबस्तामुळे पोलिस व्यस्त
^सध्या नवरात्रीचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हीच बाब चोऱ्या वाढण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. तसेच बाहेर ठिकाणची चोरट्यांची टोळी शहरात हैदोस घालत असावी, असा आमचा अंदाज आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी आमची यंत्रणा कामाला लागली आहे. राजकुमार व्हटकर, पोलिस आयुक्त.
बातम्या आणखी आहेत...