आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Their Home In Around Burned To Death Pratibh Raut

श्रावणात माहेरी येण्याची आस लावून बसलेल्या प्रतिभाचा जळाल्याने अकस्मात मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- श्रावणमहिना लागला आहे, त्यामुळे माझ्यासाठी महादेवाची एक पिंड घेऊन ठेव, मी दोन दिवसांनंतर येऊन पिंड घेऊन जाते... असे दोन दिवसांपूर्वी ताईने फोनवर बोलताना सांगितले होते. त्यामुळेच मी तिच्यासाठी पिंड घेऊन ठेवली. ताई कधी येणार याची वाट पाहत असतानाच ती जळाल्याचा आम्हाला फाेन आल्याने धक्काच बसला. आम्ही तातडीने रुग्णालयात पोहोचलो, तर ताईचा जळाल्याने मृत्यू झाला होता. माहेरी येण्याची आस लावून बसलेल्या माझ्या ताईच्या मृत्यूला सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप भाऊ चंद्रकांत बुरडे यांनी केला आहे. प्रतिभा प्रभाकर राऊत (४५, रा. कैकाडीपुरा, परतवाडा) असे मृतक विवाहितेचे नाव आहे.
प्रतिभा यांचा पाच वर्षांपूर्वी प्रभाकर राऊतसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरची मंडळी तिला त्रास देत होते. याविषयी तिने यापूर्वी आम्हाला लेखी मौखिक स्वरूपात कळवले होते. रविवारी (दि. १६) रात्री ताईचा फोन आला होता. त्या वेळी ताईने मला श्रावण महिना असल्यामुळे महादेवाची पिंड आणायला सांगितली, ती मी आणली. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात एका नातेवाइकाकडे कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जाणार होतो. असे वाटले त्या ठिकाणी ताईसुद्धा येईल, त्याच ठिकाणी पिंड देता येईल. मात्र, त्या कार्यक्रमात ताई पोहोचलीच नाही. आम्ही सर्व जण तिची प्रतीक्षा करीत असताना दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ताईच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचा आम्हाला फोन आला. त्यांनी सांगितले की, ताई जळाली आहे. त्यामुळे तातडीने आम्ही रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत ताईचा मृत्यू झाला होता. हे सांगत असताना बँकेत व्यवस्थापक असलेल्या ४२ वर्षीय भावाला अश्रू अनावर झाले होते. ताई सासरच्या त्रासामुळेच गेली, असा आरोप करून आपण पोलिसातही तक्रार करणार असल्याचे चंद्रकांत बुरडे यांनी सांगितले.
नेहमीच द्यायचे त्रास
प्रतिभायांचा परतवाडा येथील प्रभाकर राऊत यांच्यासोबत पाच वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यानंतर सासरची मंडळी प्रतिभा यांना त्रास देत होती. तसे २०११ मध्ये तिने पत्राद्वारे आम्हाला ( माहेरच्या मंडळीला) कळवले होते. तसेच दिराविरुद्ध परतवाडा पोलिसात तक्रारसुद्धा दिली होती. सासरच्या मंडळीकडून त्रास अजूनही सुरूच होता, असे चंद्रकांत बुरडे यांनी सांगितले.