आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन कोटी खर्चूनही बँक ऑफलाइनच, सभासद संभ्रमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हापरिषद शिक्षक सहकारी बँक आॅफलाइन झाल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षकांची हक्काची जिव्हाळाची असलेली शिक्षक बँकेला कोअर बँकींग करण्याच्या नावाखाली संचालक मंडळाने कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र बँक शंभर टक्के ऑनलाइन झाली नाही. केलेला खर्च व्यर्थ गेला असून लाभ मिळत नसल्याने सभासद देखील संभ्रमात पडले आहेत.
शिक्षक बँकेच्या एकूण १३ शाखा असून सर्व शाखा इंटरनेद्वारे मुख्यालयास जोडण्यात आल्या. मुख्यालय गाडगेनगर शाखेत एटीएम सुविधा उभारण्यात आली, मात्र अनुभवी पदाधिकारी कर्मचारी नसल्याने ही सुविधा सपसेल फेल ठरली आहे. त्यामुळे शिक्षक बँक ऑनलाइन होऊन देखील ऑफलाइन ठरली आहे.
कित्येक शाखांना कनेक्टीव्हीटी नसल्याने ग्राहकांना पैसे घेण्याासाठी तास-न्-तास थांबावे लागते. इतर सुविधा देखील उपलब्ध नसल्याने बँकेच्या कार्यप्रणाली विषयी शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत जवळपास १० हजार खातेदार आहेत, त्यापैकी हजार सभासद आहेत. त्यांच्या खात्यात लाखो रुपये जमा राहतात. सभासद दरमहा ६०० रुपये त्यांच्या वेतनातून कपात करुन बँकेला देतो.
त्यामधून सभासदांच्या मासिक ठेवी, शेअर्स, बाहेरील ठेव अशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बँकेत होते. मात्र ग्राहकांना समाधानकारक सुविधा देण्यास ही बँक अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. कोअर बँकींग करीत आयएफएससी एमआयसीआर कोड घेण्यात आला. प्रत्येक शाखेला वेगवेगळा कोड मिळाला, मात्र तो कधीच मॅच झाला नसल्याचे दिसून आले आहे. अध्यक्ष सरव्यवस्थापनाचे दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षकांचे ऑनलाइन होणारे वेतन अन्य राष्ट्रीयकृत बँकेत जात आहे. आठ-आठ दिवस शाखांना कनेक्टीव्हीटी नसते, त्यामुळे ग्राहकांना सेवा मिळू शकत नाही. याकरिता बँकेने तांत्रिक सल्लागार कंपनीला याबाबत कंत्राट दिला, त्याकडून ऑनलाइन प्रणाली व्यवस्थित करुन घेणे गरजेचे होते. मात्र करारानुसार उत्तम सेवा देण्यास कंत्राटदार अपयशी ठरला असून संचालक मंडळाने देखील त्याकडे दुर्लक्ष केले. शिक्षकांचे वेतन या बँकेतून होणे बंद झाल्यास त्याचा परीणाम दीर्घ मुदती ठेवी परतीवर, कर्जवाटप, कर्ज वसूली त्याचबरोबर खेळते भांडवल यावर होणार आहे.

शिक्षक बँकेला दरमहा २० कोटी
जिल्हापरिषदेकडून शिक्षकांच्या वेतनापोटी दरमहा २० कोटी रुपये बँकेला मिळतात. त्यामधील लाखो रुपये सभासदांच्या खात्यात जमा राहत होते, त्यावरच दैनंदिन आर्थिक कारभार चालत होता. आता शिक्षकांचे वेतन दुसऱ्या बँकेतून झाले तर शिक्षक बँकेला ही रक्कम वापरायला मिळणार नाही. त्यामुळे बँक डबघाईस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...