आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधव्यक्तीकडून पैसे उकळल्याप्रकरणी तीन पोलिस निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंधव्यक्तीकडून पैसे उकळल्याप्रकरणी बडनेरा ठाण्यातील तीन पोलिसांना शुक्रवारी पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. नोवा पिटर सालोमन (बक्कल नं. १२५४), वाहनचालक श्याम भाऊराव वाकपंजार (बक्कल नं. ८) आणि रूपचंद लक्ष्मण चंदेल (बक्कल नं. ११४०), अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. पैसे उकळल्याच्या आरोपावरून या तीन पोलिसांची सहायक आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली होती. तथापि, चौकशीचा गोपनीय अहवाल आयुक्त व्हटकर यांच्याकडे सादर करण्यात आल्यानंतर आयुक्तांनी हे आदेश काढले आहे.
मागील आठवड्यात बडनेरा ठाण्यातील या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी अंध व्यक्तीकडून पैसे उकळल्याची तक्रार आली होती. त्या तक्रारीची चौकशी फ्रेजरपुरा उपविभागाचे सहायक आयुक्त महेश जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...