आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील खोलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील ३० वर्षीय युवकाने एका १४ वर्षीय बालिकेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होता. सदर प्रकरणात येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या न्यायालयाने आरोपी युवकाला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय न्यायालयाने शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी दिला आहे.

विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, संजय महादेव ठाकरे (३०, रा. म्हैसपूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. फेब्रुवारी २०१४ ला दुपारी १४ वर्षीय मुलगी तिच्या दोन मैत्रिणीसंह बोरवनात बोरं आणण्यासाठी गेली होती. त्याच वेळी संजय ठाकरे हा या मुलींच्या मागे बोरवनात गेला. त्याने दोन मुलींना दुसरीकडे जाण्यास सांगितले. त्या वेळी संजयने १४ वर्षीय मुलीसोबत असभ्य वर्तन केले. झालेल्या प्रकारामुळे ती युवती घाबरली आणि आरडाओरड करायला लागली. त्याच वेळी त्या मैत्रिणीच्या काकाने तिची संजयच्या तावडीतून सुटका केली. ती युवती घरी परत आली. तिने घडलेली घटना नातेवाइकांना सांगितली. याप्रकरणी बालिकेच्या वडिलांनी फेब्रुवारी २०१४ ला खोलापूर ठाण्यात संजय ठाकरेविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बालिकेचा विनयभंग पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी २७ मे २०१४ ला दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची न्यायालयात सुणावली सुरू झाली असता सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सोनाली क्षीरसागर यांनी तीन साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या. या वेळी एक साक्षीदार फितूर झाला. मात्र, पीडित बालिकेचा जबाब परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेता न्यायालयाने संजय ठाकरेला वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा १०० रुपये दंड ठोठावला आहे.
बातम्या आणखी आहेत...