आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावाचा जन्म दाखला मिळणार वर्षे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नावात काय असतं? असा जगप्रसिद्ध कवी विल्यम शेक्सपिअर यांच्यासह अनेकांचा प्रश्न असतो. पण, नावातच सर्वकाही असतं, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे नेमकं हेच नामपुराण लक्षात घेऊन शासनाने अमरावती महापालिका क्षेत्रात जन्मलेल्या व्यक्तींना नावासह दाखला मिळवण्यासाठी तब्बल पाच वर्षांची मुभा दिली आहे.

शासनाचा हा नवा निर्णय १४ मे २०२० पर्यंत लागू राहणार असून, मनपाने त्यावर या वर्षीच्या १५ मेपासून अंमल सुरू केला आहे. कोणत्याही धर्मात जन्मताच नाव ठेवायची पद्धत नाही. महिना-सव्वा महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालखंडानंतर बारसे आयोजित करून नाव ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे नव्याने जन्माला आलेल्या पाहुण्याचा (बाळाचा) जन्मदाखला तयार करताना त्यावर नाव लिहता ते बाळ पुरुष की महिला, असाच उल्लेख केला जातो. पुढे याच दाखल्याच्या आधारे शाळा-महाविद्यालयांतील प्रवेश नोकरी, निवृत्तीपर्यंतचे सोपस्कार निस्तारले जातात.
परंतु, परदेशात जाण्यासाठी लागणारे पारपत्र किंवा अत्यंत महत्त्वाची कारवाई पूर्णत्वास नेताना नावाचा उल्लेख असलेलाच जन्मदाखला मागितला जातो. हीच अडचण लक्षात घेता शासनाने पाच वर्षांसाठी ही विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सध्या हयात असलेल्या अमरावतीत जन्मलेल्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीला नावासह जन्म तारखेचा दाखला प्राप्त करून घेता येणार आहे.
नव्या निर्णयाचा सर्वांना लाभ
अमरावती महापालिका क्षेत्रात जन्मलेल्यांना महापालिकेतूनच दाखला मिळवावा लागतो. तो नेहमी पुरुष किंवा स्त्री अशा उल्लेखाचाच असतो विशेष मागणी अर्ज पाच रुपये जादा शुल्क भरून तो नावासहही प्राप्त करून घेता येतो. मात्र, वयाची १४ वर्षे पूर्ण व्हायच्या आतील मुला-मुलींसाठीच ही सोय आहे. नव्या निर्णयामुळे या सर्वांची सोय झाली आहे.

नावाचा जन्म दाखला मिळणार वर्षे
एरवी चौदा वर्षे वयापर्यंतच्या मुला-मुलींच्या पालकांना मागणीनुसार नावासह दाखले देता येतात. परंतु, त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी कायद्यात तरतूद नाही. नव्या िनर्णयानुसार अशा सर्वांची सोय झाली आहे. त्यामुळे ज्यांना गरज आहे, अशा सर्वांना १४ मे २०२० पर्यंत नावासह दाखले दिले जाईल. डॉ.श्यामसुंदर सोनी, वैद्यकीय अधिकारी, मनपा, अमरावती.