आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३८ उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला, बाजार समितीत झाले ९९.२९ टक्के मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर रेल्वे- येथीलकृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी मंगळवारी (दि. १८) घेण्यात आलेल्या निवडणुकीत ९९.२९ टक्के मतदान झाले असून निवडणूक शांततेत पार पडली. दरम्यान, रिंगणात असलेल्या ३८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला बुधवारी (दि. १९) सकाळी नऊ वाजतापासून खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात होणाऱ्या मतमोजणीनंतर होणार आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी ३८ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी चांदूर रेल्वे पळसखेड, राजुरा घुईखेड या चार गावांमधील नऊ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. एकूण ३७४ पैकी ३७२ मतदारांनी हक्क बजावला.या निवडणुकीत आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे पॅनेल माजी आमदार अरूण अडसड दिलीप गिरासे यांच्या नेतृत्त्वातील भाजप-राकॉ समर्थित पॅनेलमध्ये चुरस झाली. दोन्ही पॅनलचे दिग्गज नेते दिवसभर मतदान केंद्रांवर तळ ठोकून बसले होते. मंगळवारी मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हक्का बजावला.