आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केलेल्या गावी आज शरद पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवार, २२ सप्टेंबरला सायंकाळी यवतमाळात दाखल झाले. येथील विश्रामगृहात त्यांनी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. बुधवारी, २३ सप्टेंबरला तालुक्यातील पिंपरी बुटी, भांबराजा, बोथबोडन येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खालावली आहे. आर्थिक संकटांमुळे शेतकरी मृत्यूस कवटाळत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत तोकडी आहे.
अडीअडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पवार मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास यवतमाळात दाखल झाले. या वेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, आमदार मनोहरराव नाईक, संदीप बाजोरिया, ख्वाजा बेग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. फुपाटे आदी उपस्थित होते. तालुक्यातील पिंपरी बुटी येथे बुधवारी सकाळी ९.४५ वाजता ते जाणार आहेत. या ठिकाणी शांताबाई ताजणे यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. सकाळी ११.३० वाजता भांबराजा येथील युवराज बानेकर यांच्या कुटुंबीयांची, तर १२.१५ वाजता बोथबोडन येथील आनंदा राठोड यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांच्या अडीअडचणी ते जाणून घेणार आहेत.