आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज, उद्या अवकाळी पावसाची दाट शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अरबी समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकत असल्यामुळे अवकाळी पाऊस गारपिटीची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त केली जात आहे. या पावसामुळे कोरडवाहू पिकांतील तूर, कपाशीसह रब्बीतील हरभऱ्याला फायदा होणार आहे. परंतु, गारपीट झाल्यास तोडणीला आलेल्या संत्र्याला जबर फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अरबी समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्र, विदर्भाकडे सरकत आहे. त्यामुळे सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी अवकाळी पाऊस गारपिटीची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त केली जात आहे. या वर्षी सप्टेंबरपासून पाऊस गायब झाल्यामुळे खरिपातील पिकांना मोठा ताण बसला आहे. यामुळेे कपाशीसह तुरीच्या पिकाला जबर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.