आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tourism Employment Opportunities In The District!

जिल्ह्यात पर्यटनातून रोजगाराची संधी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संत-महंतांची भूमी म्हणून अमरावती जिल्ह्याची आेळख आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटमुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे. मेळघाटातील पट्टेदार वाघांसह इतर वन्यजीव येथील सौंदर्य सदैव पर्यटकांना खुणावते. परंतु, मेळघाटकडे शासन ज्याप्रमाणे लक्ष देते, त्याप्रमाणे जिल्ह्यातील इतर तीर्थस्थळांकडे लक्ष दिल्यास भविष्यात जिल्ह्यात पर्यटनाचा विकास होईल.यातून रोजगार निर्मिती होऊन अनेकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

अमरावती जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून मेळघाटची आेळख आहे. मेळघाटाचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी लोक दूरवरून जिल्ह्याला भेट देतात. परंतु, मेळघाट वगळता जिल्ह्यात इतरही ऐतिहासिक धार्मिक पर्यटनस्थळं आहेत. दरम्यान, शासनाचे या स्थळांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून, हे स्थळ विकासापासून वंचित राहिले आहे. जिल्ह्यातील स्थळांचा विकास झाल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. पर्यटकांसह शासनाने या स्थळांकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील मेळघाट वगळता इतर स्थळांचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. पर्यटनामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला वाव आहे.

- चिखलदरा (विदर्भाचेनंदनवन)
- रिद्धपूर (महानुभावपंथांची काशी)
- छत्रीतलाव, वडाळी तलाव आणि शिवटेकडी (अंबानगरीतीलपर्यटनस्थळे)
- सालबर्डी (निसर्गसंपन्नटेकडी)
- कोंडेश्वर,तपोवनेश्वर खंडेश्वर (धार्मिकस्थळे)
- सावंगाविठोबा
- भातकुली (जैनांचेतिर्थस्थळ)
- बहिरम (अचलपूर)
- नेरपिंगळाई (धार्मिकस्थळ)
- लासूर (आनंदेश्वरहेमाडपंथी प्राचीन मंदिर)
- मालखेड(बोटिंग,पर्यटनस्थळ)
- कौंडण्यपूर(धार्मिकतीर्थक्षेत्र, रुक्मिणीचे माहेरघर)
- सिंभोराडॅम (अप्परवर्धा धरण)

पर्यटकांचे होईल स्वागत
२७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे आैचित्य साधून एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) विभागातर्फे पर्यटकांचे स्वागत केले जाईल. पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, बडनेरा रेल्वेस्थानक आणि अंबादेवी मंदिर येथे पर्यटकांचे हे स्वागत केले जाईल, अशी माहिती विभागाच्या शिप्रा बोरा यांनी दिली.