आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण पोलिस दलातील सात ठाणेदारांच्या बदल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ग्रामीणपोलिस दलातील काही ठाणेप्रमुखांच्या बदल्या िजल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी नुकत्याच केल्या आहेत. त्यामध्ये ज्या ठाण्यांचे ठाणेदार बदली पदोन्नतीने जिल्ह्याबाहेर बदलीवर गेलेले आहे. त्या ठाण्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्ह्यातील खोलापूर, खल्लार, जिल्हा विशेष शाखा, तळेगाव दशासर, नांदगाव खंडेश्वर, धारणी कुऱ्हा ठाण्यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला कार्यरत असलेले सहायक पेालिस निरीक्षक शंकर शिंपीकर यांची बदली खल्लारचे ठाणेदार म्हणून झाली. या ठिकाणी असलेले शंकर मुळे यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. तसेच अंजनगाव सुर्जी येथे कार्यरत असलेले एपीआय नरेन्द्र ठाकरे यांची बदली खोलापूर ठाणेदार म्हणून, जिल्हा विशेष शाखेला असलेले चव्हाण यांची कुऱ्हा ठाणेदार, तळेगाव दशासर येथील ठाणेदार दिवे यांची जिल्हा विशेष शाखेला बदली झाली. याचवेळी तळेगाव येथे एपीआय नरवणे यांना ठाणेदार म्हणून नेमण्यात आले. तसेच लोणी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक रामोड यांची स्थानिक गुन्हे शाखेला बदली देण्यात आली आहे. तसेच वरूडला असलेले एपीआय शेळके यांची नांदगाव खंडेश्वर ठाणेदार म्हणून तसेच नांदगाव खंडेश्वरला ठाणेदार असलेले तामडे यांची धारणी ठाणेदार म्हणून बदली झाली आहे. या व्यतिरीक्त अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्याही बदल्या लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयुक्तालयातीलअधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या लवकरच
शहरपोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गंत बदल्या लवकरच होणार आहे. ज्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. अशा अधिकाऱ्यांचा बदली यादीमध्ये समावेश राहणार आहे.
महासंचालकांनी केलेल्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये आयुक्तालयातून ज्या पोलिस उपनिरीक्षकांना पदोन्नतीवर बदली मिळाली आहे, किंवा ज्या अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे. त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.