आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद पोलिसांना फैरी झाडून दिली सलामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कर्तव्यबजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या वीर पोलिस जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवारी (दि. २१) शहर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी शहीद स्मृती परेडचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिसांनी परेड करून तसेच हवेत फैरी झाडून शहीद पोलिसांना सलामी दिली. याच वेळी देशभरात शहीद झालेल्या ४३६ शहीद पोलिसांच्या नावांचे वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अरुण ढवळे, मुख्य वनसंरक्षक दिनेश त्यागी, विशेष पोलिस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलिस अधीक्षक लख्मी गौतम, एसआरपीएफचे अधीक्षक डाखोडे, ग्रामीणचे अप्पर पेालिस अधीक्षक ए. राजा, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, बी. के. गावराने यांच्यासह अन्य अधिकारी हजर होते. सकाळी वाजता परेड झाली. त्यानंतर शहीद पोलिसांना मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली. तसेच देशभरात सप्टेंबर २०१४ ते ३० ऑगस्ट २०१५ या वर्षभरात देशातील अंतर्गत दहशतवादासोबत लढताना वीरमरण प्राप्त झालेल्या ४३६ शहीद पोलिस जवानांच्या नावाचे वाचन सहायक पोलिस निरीक्षक सुमीत परतेकी आणि उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी केले.

वर्षभरात एक अधिकारी कर्मचारी शहीद
देशांतर्गतअसलेल्या दहशतवादाला उत्तर देताना अनेकदा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वीरमरण प्राप्त होते. एखादे वेळी दंगलीमध्ये सुद्धा पोलिसांना प्राण गमवावे लागतात. मागील वर्षभरात महाराष्ट्र पोलिस दलातील एक अधिकारी कर्मचारी शहीद झाले आहे.

स्मृती परेडसाठी ९० पोलिस कर्मचारी
आजच्याविशेष स्मृती परेडसाठी ९० पोलिस अधिकारी कर्मचारी होते. या परेडचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी केले होते. याच वेळी एक राखीव पोलिस निरीक्षक, राखीव पोलिस उपनिरीक्षक, एसआरपीएफचे उपनिरीक्षक परेडमध्ये होते.
बातम्या आणखी आहेत...