आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दुचाकींच्या धडकेत दोन ठार, मदनापूर गावानजीक घडला भीषण अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दोनभरधाव दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीचालकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही अपघाती घटना खोलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दर्यापूर मार्गावरील मदनापूर गावानजीक मंगळवारी(दि. १७) दुपारच्या सुमारास घडली.
बाबाराव गुलाबराव रावळे (४८, रा. खोलापूर) आणि सीताराम पांडूरंगजी खडसे (३५, रा. बुधागड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. या घटनेमुळे भातकुली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मृतक बाबाराव रावळे यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आल.
बाबाराव रावळे हे मंगळवारी दुपारी वाजताच्या सुमारास खोलापूरवरून अमरावतीच्या दिशेने दुचाकीने येत होते. खोलापूरवरून काही अंतरावर असलेल्या मदनापूर गावानजीक आल्यानंतर विरुद्ध दिशेने दुचाकीने येत असलेल्या सीताराम खडसे यांच्या दुचाकीसोबत टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकींचा दर्शनी भाग चक्काचूर झाला दोन्ही चालक घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

बाबाराव रावळे यांचे खोलापूर येथे पादत्राणे विक्रीचे दुकान आहे तसेच त्यांच्याकडे शेतीसुद्धा आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी शेतातील सोयाबीन विक्री करण्यासाठी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाठवले होते. त्यामुळे दुपारी वाजताच्या सुमारास ते दुचाकीने बाजार समितीमध्ये येण्यासाठी निघाले होते. मात्र खोलापूरपासून अवघे आठ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर विरुद्ध दिशेने येत असलेली दुचाकी त्यांच्या दुचाकीवर धडकली त्यांचा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बाबराव रावळे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच उमेश अर्डक, कैलास अवघड, बंडू जामनेकर, वसंतराव इंगळे यांच्यासह शिवसैनिक नागरिकांनी इर्विनमध्ये गर्दी केली.

बाबाराव रावळे यांचे नेत्रदान
बाबारावरावळे यांचे अपघाती निधन झाले. त्यांनी मृत्यूपुर्व नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच नातेवाईकांनी दु:ख बाजूला ठेवून याबाबतीत डॉक्टरांना सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी आवश्यक यंत्रणेला पाचारण करून बाबाराव रावळे यांचे नेत्र दान करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली.

पुढील स्‍लाइडवर वाचा भावाला ओवाळण्यापूर्वीच बहिणीवर काळाचा घाला; रस्त्यात अपघाती मृत्यू