आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार चालकाने पाच दुचाकींना चिरडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जुना काटन मार्केटकडून पंचवटीच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या एका बेधूंद कारचालकाने इर्विन चौकातील सौदर्यीकरणाच्या कठड्याला धडक देण्याचा प्रयत्न केला. ही धडक वाचविण्याच्या नादात या कारचालकाचे कारवरून नियंत्रण सुटले कार थेट चौकातील हॉटेलसमोर उभ्या असलेल्या दुचाकींना चिरडत पुढे निघाली. रविवारी सांयकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोघे जखमी झाले असून, सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. मात्र पाच दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . मनीष श्रीराम साबळे (३९ रा. रहाटगाव) अन्य एक असे जखमींचे नाव आहे. रविवारी सायंकाळी (एम. एच. २७ बीई २३७४) आय व्टेन्टी काचालकइर्विन चौकातून पंचवटीकडे जात होता. त्यावेळी कार चौकातील सौंदर्यीकरणाच्या कठड्याला घासली, त्यामुळे चालकाने ती वळवण्याचा प्रयत्न केला तोच त्याचे कारवरून नियंत्रण सुटले ही कार थेट सुरज हॉटेलसमोर उभ्या असलेल्या दुचाकींना चेंगरून पुढे निघाली. या प्रकाराने इर्विन चौकातखळबळ उडाली. कारण सायंकाळची वेळ असल्याने चौकात मोठी गर्दी होती. कोतवालीचे प्रभारी ठाणेदार राधेश्याम शर्मा यांनी बेधूंद कारचालकाला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. वृ़त्त लिहिस्तोवर पोलिस कारवाई सुरू होती.