आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहकांच्या मोबाइलमुळे एसटीला लाखाेंचा चुना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजुराबाजार - भ्रष्टाचारी वाहकांना लगाम लावण्यासाठी एसटीची भरारी पथके कार्यरत आहेत. मात्र भरारी पथके कोणत्या मार्गावर आहेत, त्यानंतर ते कोणत्या मार्गावर राहणार याची इत्यंभूत माहिती वाहकांना त्यांनी नेमलेल्या वेगवेगळ्या स्टाॅपवरील खबऱ्यांकडून मिळत असते. त्यामुळे वाहकांच्या संमतीने विना तिकीट किंवा अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे एसटी महामंडळाला दररोज लाखाेंचा चुना लागत आहे. सेटिंग करून प्रवाशी वाहतूक केवळ पुरुष वाहकच करतात असे नाही,तर महिला वाहकही यात अग्रेसर आहेत. त्यांचेही खास खबरी ठरलेले आहेत.

'प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी हे ब्रीद वाक्य असणारी एसटी आता वाहकांच्या उत्पन्नाचे अतिरिक्त साधन बनल्याचे दिसत आहे. सुरक्षित प्रवास म्हणून ग्रामीण भागातील प्रवाशी एसटीनेच प्रवास करण्याला प्राधान्य देतात. याचाच फायदा मात्र काही वाहक घेत असून एसटीच्या माध्यमातून मलिदा लाटण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. आपल्या खबऱ्यांकडून तिकीट तपासणीचे लोकेशन घेऊन बसमधील बहुतेक प्रवाशांना अर्ध्या तिकीटामध्ये घेऊन जातात किंवा विना तिकीट घेऊन जातात. तिकिटाचे पैसे मात्र वाहक आपल्या खिशात टाकतात. यामुळे मात्र काही प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
एकट्या वरुड आगारातून दररोज जवळ्पास दहा हजार प्रवाशी ये-जा करतात. कित्येक वाहक तर प्रवाशांना सुटे पैसेच परत करीत नाहीत, तर कित्येक जण प्रवाशांना तिकीटही देत नाही. प्रवाशांनी तिकीट मागायचा प्रयत्न केल्यास वाहकांकडून अरेरावी केली जाते. प्रवाशांच्या तिकिटाद्वारे भ्रष्टाचार करून कित्येक वाहक दिवसागणिक मोठी रक्कम घरी घेऊन जातात.
अशा भ्रष्टाचारी वाहकांना लगाम लावण्यासाठी एसटीची भरारी तपासणी पथके कार्यरत आहेत. मात्र भरारी पथक नेमके कोणत्या मार्गावर आहे नंतर कोणत्या मार्गावर येणार याची माहिती वाहकांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत असते. यासाठी अशा खबऱ्यांना वाहक कमाईतील काही हिस्सा बक्षिस म्हणून देतात.
आम्हाला माहिती नाही:
एसटीचेवाहक हे ितकिटाच्या माध्यमातून मलिदा लाटतात. त्यावर वचक बसवण्यासाठी एक समिती अमरावती येथून काम पाहते.त्याबाबत आम्हाला काहीही माहिती नसल्याचे वरुड येथील बसस्थानक प्रमुखांनी सांगितले.

प्रवाशांचीही असते सेटिंग :
रोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचारी प्रवाशांचीही वाहकांसाेबत 'सेटिंग' झालेली असते. असे कर्मचारी मुळ तिकिटाच्या रकमेच्या अर्धी रक्कम देऊन झोकात 'विदाऊट' प्रवास करत असतात.
मोबाईल वापराची सूट :
महामंडळानेचालकाला मोबाइल वापरण्यास मनाई केली आहे. तशी मनाई वाहकांना नसल्यामुळे या निर्णयाचा वाहक चांगलाच गैरफायदा घेत आहेत.