आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींच्या शोधार्थ पोलिस पुन्हा उस्मानाबादला रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पंधरा दिवसांपूर्वी वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेवसा येथील टायर गोदामातील दरोड्यात सहभागी उर्वरित आरोपींच्या शोधार्थ वलगाव पोलिसांचे पथक मंगळवारी (दि. ११) उस्मानाबादला रवाना झाले. रेवसा येथील दरोड्यामध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली वलगाव पोलिसांनी अनिल नाना काळे (२८), बालाजी छगन काळे (४५) आणि जयदत्त बाबासाहेब तिडके (२८, रा. बीड) यांना अटक केली आहे. या तिघांनाही १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यांनी पोलिसांना दरोड्याबाबत काही माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे पुढील तपास करण्यासाठी वलगावचे उपनिरीक्षक राजू लेवटकर त्यांचे पथक उस्मानाबादला रवाना झाले.याच वेळी उर्वरित टायर दरोड्यासाठी वापरलेल्या वाहनांचासुद्धा शोध घेण्यात येणार आहे.