आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Various Training Programmes For Homeless, Needy Youths

सुखद सोमवार: निराधार, गरजू तरुणांसाठी विविध प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - इकोफ्रेंडली गणेशाची स्थापना करा, असा शहरात संदेश देण्यासाठी केवळ गणेश मॅरेथॉन आयोजित करून थांबता श्रीगणेशाच्या ८०० मातीच्या मूर्ती विकून जो निधी गोळा झाला त्याचा उपयोग शुभारंभ इव्हेंट्स ही सामाजिक भान ठेवणारी संस्था १५ ते २९ वयोगटांतील तरुणांना त्यांच्या पायावर भक्कमपणे उभे राहता यावे म्हणून विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण देणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने निसर्ग रक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि इको फ्रेंडली गणपतीसोबतच काही सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी काम करणाऱ्या या संस्थेने अनाथ, निराधार आणि गरजू तरुणांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. याअंतर्गतच २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अमरावती येथील ब्रह्मकुमारीज येथे सकाळी ते सायंकाळी या कालावधीत विविध विषयांचे तज्ज्ञ, समुपदेशक तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी काही प्रमाणात शासकीय मदतही मिळत असते.
शासनाच्या दृष्टीने या उपक्रमाचे नाव लाइफ स्किल एज्युकेशन कॅम्प असे आहे. या युवकांमध्ये विचार, यशस्वीपणे बोलण्याचे कौशल्य सर्वप्रथम विकसित केले जाणार आहे. यासोबतच शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम, प्राणायाम धावणे, जबाबदारी ओळखणे २८ नोव्हेंबरला महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी गरजू अनाथ मुलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम नव्याने सुरू केला जाणार आहे. यासाठी ब्रह्मकुमारीजने अमरावती येथे जागा उपलब्ध करून दिली आहे.

उपक्रमासाठी परिश्रम
१५ ते २९ वर्षे वयोगटांतील अनाथ, निराधार गरजू तरुण सहजासहजी प्रशिक्षण घेण्यास तयार होत नाहीत. आधी असे विद्यार्थी शोधणे, नंतर त्यांचे गट पाडणे, त्यांनी नियमितपणे प्रशिक्षण घेण्यासाठी यावे म्हणून प्रयत्न करणे, त्यांना समजावणे, नि:शुल्क भोजनासोबतच चहा नाष्ट्याची सोय करावी लागते.

वृद्धाश्रमात देणार जेवण
हक्काच्याघरापासून मुकलेल्या मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनाही गणेशोत्सव साजरा करण्याचा हक्क आहे, या जाणिवेने'शुभारंभ'तर्फे ज्येष्ठांना एक दिवस गणपतीचा प्रसाद म्हणून जेवण दिले जाईल. त्यामुळे त्यांनाही आपल्या कुटुंबासोबतच आहोत, असे वाटेल, हीच यामागील भावना होय.

देश, समाज हेच कुटुंब, ही भावना रुजवणे : आपणएकटे आहोत, मग काय करायचे? अशी भावना अनाथ, निराधार गरजू तरुणांची असते. त्यांच्यात देश समाज हेच आपले कुटुंब असल्याची भावना रुजवणे, तुम्ही एकटे नाही, तर आम्ही तुम्हाला आधार देतो, तुम्हीही इतरांना काहीतरी करून दाखवा, तुम्हीही सर्वकाही करण्यास समर्थ असल्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जातो, असे दीपक घाटे यांनी सांगितले.