आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यासाठी केले रस्त्यावर उपोषण, आश्वासनानंतर उपोषण मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरूड- लोणीते आलोडा मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारपासून उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी खासदार रामदास तडस यांच्या आश्वासनानंतर सोमवारी (दि. २३) उपोषण मागे घेतले.
लोणी ते आलोडा हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे काम मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आले. परंतु ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. सुमारे पाऊणेआठ किमी लांबीच्या या रस्त्यासाठी कोटी ५३ लाख १५ हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार होता.
ठेकेदाराने काम वाऱ्यावर सोडल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. रस्ता तयार करण्याकरिता रुंदीकरणासह रस्त्यावरील पुलांचे बांधकाम सुरू केले. यासाठी जुना रस्ता काढण्यात आला. सदर रस्त्यावर पावसाळ्यात शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यावेळी नागरिकांनी ओरड केली असता वरूडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. याबाबत पालकमंत्री, आमदार, खासदारांना नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी दिल्या. परंतु दखल घेण्यात आल्याने अखेर भाजपाचे कार्यकर्ते मनोहर दाभाडे, अरविंद कोकाटे यांनी अखेर लोणी आलोडा रस्त्यावरच शनिवारपासून उपोषण सुरू केले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी शेतकरी-शेतमजुरांना मोठा त्रास होत आहे. पुलासह रस्त्याचे अर्धवटबांधकाम डोकेदुखी ठरत आहे. सदर उपोषणाला प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता वि.शा.जवंजाळ यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना निधी आल्यावर तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्रलेखी पत्रामध्ये कामाचा निधी उपलब्ध करण्याकरिता पाठपुरावा सुरू असून निधी उपलब्ध होताच तातडीने काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

भाजपचे आलोडा शाखाप्रमुख मनोहर दाभाडे तसेच संघटक अरविंद कोकाटे यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करून घरचा अहेर दिला आहे. याबाबत उपोषण कर्त्यांनी आमदार डॉ. अनिल बोंडे यांना वारंवार सांगूनही तोडगा निघाला नसल्याने अखेर खा. रामदास तडस यांनी सोमवारी (िद. २३) रात्री वाजताच्या सुमारास प्रदेश कार्यकारिणी सदस्य निशांत गांधी यांच्यासह उपोषण मंडपाला भेट देवून मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
लोणी ते आलोडा मार्गावर उपोषण करणाऱ्या भाजपच्या आंदोलकांसोबत खासदार तडस यांनी चर्चा करून उपोषण सोडवले.