आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोधूनही सापडेना हो, ‘पशुवैद्यकीय’ची जागा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगावसुर्जी - शहरात शासकीय कार्यालये अाणि दवाखान्यांसाठी आरक्षित केलेल्या अनेक भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी आरक्षित असलेली जागाही काळाच्या ओघात गडप झाली आहे. त्यामुळे दवाखान्याच्या बांधकामासाठी ही जागा शोधताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.
येथील नगर परिषदेचा प्रथम विकास आराखडा १९७६ मध्ये अमलात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजीपाला मार्केट, शाळा, बगिचा, खेळाचे मैदान, ग्रंथालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, अशा विविध विकासकामांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. परंतु, शहराच्या विस्तारीकरणात आरक्षित झालेल्या जागांचा संबंधित कामासाठी उपयोग करण्यात आल्याने नगर परिषदेने याबाबत ठराव घेऊन काही जागांवर ले-आउट पाडले, तर काही जागांवर कमर्शिअल कॉम्प्लेक्स बांधण्यात आलेत. मात्र, या सर्वांमध्ये फरपट होत आहे, ती पशुवैद्यकीय दवाखान्याची. दवाखान्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे एका पडक्या इमारतीत पशुवैद्यकीय दवाखाना सुरू असून, तालुक्यातील जनावरांवर तेथेच उपचार केले जातात. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दवाखान्याच्या आरक्षित जागेबद्दल नगर परिषदेकडे विचारणा केली. परंतु, त्यावर नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर देण्यात येत नाही. जागेअभावी दवाखान्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी येणारा लाखो रुपयांचा निधी परत जातो. दुसरीकडे याबाबत कुणीही आवाज उठवत नसल्यामुळे नगर परिषदेवर वर्चस्व कुणाचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

इमारतीच्याबांधकामाचा निधी जातो परत
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामासाठी प्रत्येक वेळी शासनाकडून निधी देण्यात येतो. परंतु, इमारत बांधण्यासाठी जागेचाच पत्ता नसल्याने येणारा निधी प्रत्येक वेळी परत जातो. परिणामी, जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये जनावरांवर उपचार करण्याची वेळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर आली आहे.

जीर्ण इमारतीत होतात जनावरांवर उपचार
नगरपरिषद दवाखान्यासाठी जागा देण्यास तयार आहे. परंतु, जागा शहराबाहेर असून ती जनावरे ग्रामस्थांसाठी गैरसोयीची आहे. परिणामी, सध्या जिथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे, त्या पडक्या इमारतीतच जनावरांवर उपचार करावे लागत आहे.

स्थानिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नगर परिषदेने ठराव घेऊन शासकीय कार्यालयांसाठी आरक्षित केलेल्या जागांवर बांधकाम केले तर कुठे ले- आऊट पाडल्याने पशुवैद्यकीय दवाखान्यासह इतर विभागाचे कामकाज प्रभावित होत आहे.

नगर परिषदेकडून जागा देण्यास सतत टाळाटाळ
^जागे संबंधीन.प.कडेविचारणा केली असता प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली जात आहे. व्ही. एस. रहाते, सहा.आयुक्त पशुसंवर्धन.

याबाबत माहिती नाही, सध्या मी सुटीवर आहे
^याबाबत मला काहीही माहिती नाही. पूर्ण चौकशी केल्यानंतरच याबाबत सांगू शकतो. सध्या मी सुटीवर आहेे. कार्यालयात येताच याबाबत चौकशी करण्यात येईल. संदीप बोरकर, मुख्याधिकारी.
दर्यापूर रोडवरील नवीन बस स्टॉप परिसरात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आरक्षित केलेल्या जागेवर असे बांधकाम करण्यात आले आहे.