आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याकडून आठशे रुपयांची लाच घेताना तलाठ्यास पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एकिकडे शेतकऱ्यांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. दुसरीकडे मात्र शासनाच्याच प्रशासकीय यंत्रणेचा भाग असलेल्या एका तलाठ्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानीच्या रकमेवरही ‘डल्ला ' मारण्याचा प्रयत्न करत आहे. नुकसानभरपाईची रक्कम देण्यासाठी लाच मारणाऱ्या निमखेड बाजार येथील विश्वनाथ गोंडाने या लाचखोर तलाठ्याला एसीबीने गुरूवारी (दि. २४) गजाआड केले.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निमखेड बाजार येथील तलाठी गोंडाने याने शेतकऱ्याला ११ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार शेतकऱ्याकडे एकर शेती आहे. याच शेतीचे खरीप २०१४ मध्ये जे नुकसान झाले होते. त्याच नुकसान भरपाईपोटी त्या शेतकऱ्याला १९ हजार २०० रुपयांचा धनादेश आला होता. तलाठ्याने हा धनादेश काढून शेतकऱ्याला दिला आहे. त्या धनादेशाचा मोबदला म्हणून ११ हजार रुपये द्यावे, अशी मागणी तलाठ्याने शेतकऱ्याकडे केली होती. सद्यास्थिती लक्षात घेता पै पै साठी जीवाचे रान करणाऱ्या शेतकऱ्याला शासनाकडून आलेल्या नुकसान भरपाईची रक्कम या तलाठ्याने मागितली. त्या शेतकऱ्यांकडे पिकांच्या मशागतीसाठी पैसे नाही तर तलाठ्याला ११ हजार कुठून देणार, असा प्रश्न होता. यातच शासनाकडून आलेल्या १९ हजार २०० रुपयांच्या रकमेची पिकांच्या मशागतीसाठी मदत होईल. मात्र तलाठ्याने मागणी केली. त्यामुळेच शेतकऱ्याने अमरावती गाठून या तलाठ्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. गुरूवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे पथक निमखेड बाजारमध्ये दाखल झाले. त्याचवेळी शेतकऱ्याने ११ हजारांपैकी ८०० रुपये तलाठ्याला दिले. ही रक्कम स्विकारत असतानाच सापळा रचून बसलेल्या पथकाने तलाठी गोंडानेला रंगेहात पकडले आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस निरीक्षक राहुल तसरे, आत्माराम इंगोले, कैलास सानप, धिरज बिरोले, तुषार देशमुख, अभय वाघ, अकबर खान यांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसात गोंडानेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.