आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांचे वेतन ५० टक्के वाढवण्यात यावे, आयुक्तांना देणार निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - श्रमिक विकास संघटनेद्वारे कामगारांचे वेतन ५० टक्के वाढवण्यासाठी शहरातील विविध लेबर चौकांमध्ये हस्ताक्षर अभियान घेण्यात आले आहे. या अभियानाला कामगारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
दरम्यान संघटनेच्या वतीने मजुरांशी संवाद साधून त्यांना वेतन वाढीव महत्त्व पटवून देण्यात आले. श्रमिकांमध्ये जनजागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने अभियान राबवण्यात येत आहे. हस्ताक्षर अभियानामध्ये शहराच्या विविध भागातील मजुरांनी, स्त्रियांनी, वयोवृद्ध नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. जवळपास हजार मजुरांनी या उपक्रमाला स्वाक्षऱ्या नोंदवून प्रतिसाद दिला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. अभियानादरम्यान गांधी चौक, हमालपुरा चौक, यशोदा नगर चौक, एमआयडीसी चौक, पॅराडाईज कॉलनी चौक, रहाटगाव चौक अशा विविध चौकांमध्ये संघटनेच्या वतीने कुशल अकुशल कामगार, मजुरांशी संवाद साधण्याला आला आहे. हस्ताक्षर अभियानासाठी राहुल चव्हाण, किरण गुडधे, राजू निर्मळ, प्रमोद कुचे, रितेश तिवारी, सुरेश साहू, अशोक वानखडे, रंजना मामर्डे, नितीन उजगावकर, रोशन अर्डक, सुरेश उमाळे, अलीम पटेल, सोहील खान, संजय पांडव, महेश बिलासे आदींसह कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे.
आयुक्तांना देणार निवेदन
अद्यापपवेतो ९० टक्के कामगारांचे लेबर कार्ड काढण्यात आले नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून मजुर वंचित आहेत. मजुरांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संघटनेच्या वतीने कामगार आयुक्त यांच्या दालनासमोर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...