आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Waiting For The Approval Of The Recommendations Of The Committee

समितीच्या शिफारशी मंजुरीच्या प्रतीक्षेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डॉ.राजेश अग्रवाल समितीकडून केलेल्या शिफारशींवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून अंमल केला जात अाहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके यांनी दिली. परीक्षा विभागात समितीच्या शिफारशीनुसार बदल केले जात आहे, तसेच अभ्यास मंडळाकडून मान्यता मिळाल्यानंतर शैक्षणिक बदल देखील केले जाणार आहे,असे प्र-कुलगुरूंनी स्पष्ट केले.
विद्यापीठातील परीक्षा प्रणालीत सुधारणेसाठी डॉ. राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शासनास ४३ शिफारसींसह अहवाल सादर केला होता. शिफारशी लागू करण्याबाबत शासन आदेश देखील निर्गमित केला होता. जुन्या पद्धती कालबाह्य होत असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत परीक्षा शैक्षणिक बदल करण्याबाबत समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आदेशित केले होते. अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार परीक्षा पद्धतीच्या मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा केली, परीक्षा विभागाचे डिजीटलाझेशन करण्याचा निर्णय घेतला, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. हिवाळी २०१५ च्या परीक्षेपासून बारकोड उत्तर पत्रिकांचा वापर केला जाणार असून, या निर्णयावर परीक्षा मंडळाकडून देखील शिक्कामोर्तब केले. मात्र शैक्षणिक बदलाबाबत असलेल्या शिफारशी अभ्यास मंडळाकडे (बोर्ड ऑफ स्टडीज्) पाठवल्या आहेत. अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत विद्यापीठाच्या विविध प्राधिकारीणींची मान्यता मिळणे आवश्यक आहे. अग्रवाल समितीकडून प्रश्न बँक प्रश्न पत्रिका संच तयार करणे तसेच ऑनलाइन परीक्षेबाबत सूचना केली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमांशी निगडीत असल्याने या शिफारशी लागू करण्याबाबत अभ्यास मंडळात चर्चा केली जात आहे. जुनी प्रणाली मोडीत काढत एकाच वेळी नवीन प्रणालीचा अवलंब करणे शक्य नसते, त्यामध्ये हळूहळू बदल होणे गरजेचे असल्याचे डॉ. तिडके यांनी सांगितले. ऑनलाइन परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांची लिहिण्याची क्षमता कमी होणार नाही, याची दक्षता देखील घेणे गरजेचे असल्याचे तिडके म्हणाले.
मूल्यांकन प्रक्रियेमध्ये करण्यात आल्या सुधारणा
अग्रवालसमितीच्या शिफारशीनुसार परीक्षा पद्धतीच्या मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा केली, परीक्षा विभागाचे डिजीटलाझेशन करण्याचा निर्णय घेतला, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. हिवाळी २०१५ च्या परीक्षेपासून बारकोड उत्तर पत्रिकांचा वापर केला जाणार असून, या निर्णयावर परीक्षा मंडळाकडून देखील शिक्कामोर्तब केले.- प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके