आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी ‘ड्राय-डे’ आता पाण्याचे ‘लो-प्रेशर’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आधी‘ड्राय-डे’ तर आता पाण्याच्या ‘लो-प्रेशर’मुळे अमरावतीकर त्रस्त झाले आहेत. एकेकाळी चोवीस तास पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला झालेय तरी काय?, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोरड्या दिवसामुळे प्रत्येक मंगळवारी आधीच पाणी नाही, त्यात कमी पाणीपुरवठ्याच्या समस्येची भर पडली आहे. त्यामुळे सर्व कामे सोडून पाणी पाणी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. स्थानिक जुना बायपास रोडस्थित जेवडनगरजवळील देशपांडे ले-आऊट, दत्त कॉलनी परिसरात मागील दोन-तीन महिन्यांपासून कमी पाणीपुरवठा केल्या जात आहे. कमी पाणीपुरवठा होण्याचा प्रकार मागील तीन ते चार वर्षांपासून कायम असल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे. घरगुती नळांद्वारे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने महिलांना मोठ्या असुविधेला सामोरे जावे लागते. शिवाय पाण्याचा अन्य स्रोत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. पाणीपुरवठ्याचा दाब कमी तसेच त्यातदेखील अनियमितता असल्याने रात्रभर जागरण करण्याची वेळ येथील नागरिकांवर येत आहे. पर्याप्त पाणी मिळावे म्हणून येथील नागरिक रात्री वाजेपासूनच जागे राहतात. अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे देखील अनेकांना त्रास सहन करावा लागतो. मजीप्राकडून पाठवण्यात आलेले देयक पूर्ण भरल्यानंतर देखील पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. महापालिका क्षेत्रात १२५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता भासते. मात्र, सद्य:स्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ९५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. शहराची तहान भागवण्यासाठी पाणी साठवणूक करण्यात मजीप्रा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहराच्या काही भागात नियमित तर काही भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. शहराचा वाढता व्याप लक्षात घेता वाढीव पाणीपुरवठा योजना लागू करणे किंवा पाणीपुरवठा यंत्रणेचा विस्तार करणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांमध्ये याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मुबलक पाणी असलेल्या अमरावतीकरांवर पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
पूर्वीशुद्ध आता पाण्यासाठी निवेदन : काहीवर्षांपूर्वी शुद्ध पाणी मिळावे म्हणून नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तक्रारी घेऊन येत होते. मात्र, आता नियमित पाणी मिळावे म्हणून नागरिकांना मजीप्रावर धडकावे लागत आहे. ३० ते ४० वर्षांपूर्वी वसलेल्या भागात ही समस्या निर्माण होत अाहे.

नाल्यातीलबुडबुड्याचे रहस्य : जुन्याबायपास रोडवरील कमल प्लाझा सभागृहाच्या बाजूला असलेल्या नाल्यातून पाण्याचे बुडबुडे निघत आहे. हा प्रकार मागील एक वर्षापासून होत आहे. भूमिगत गटार पाइपलाइनमधून हे पाणी निघत असल्याची माहिती मजीप्राकडून प्राप्त झाली. मात्र, सतत पाणी वाहत असल्याचे त्याचे रहस्य बाहेर पडणे गरजेचे झाले आहे.
ऐतिहासिक अमरावती महापालिका क्षेत्रात भासते १२५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता
^पहाटे ते दरम्यान पाणीपुरवठा केल्यास येथील नागरिकांच्या दृष्टीने सुविधाजनक होईल. िवाय अवेळी होत असलेल्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहे. रोज तसेच नियमित पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणीदेखील आहे. पाण्याची समस्या निकाली काढणे गरजेचे आहे. लीलाघिमे, गृहिणी.

तक्रारीची घेतली जात नाही दखल
^नियमित पाणीपुरवठ्यासाठी अनेकदा तक्रारी केल्या. येणाऱ्या अडचणींची माहिती देऊनही मजीप्राचे अधिकारी कर्मचारी लक्ष देत नाहीत.तक्रार दिल्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो. नंतर परिस्थिती जैसे-थे होते. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सुनीताश्रीराव,गृहिणी.
भविष्यातील पाण्याची मागणी (महापालिका वर्ग)

तीन वर्षांपासून आहे पाण्याची समस्या
^मागील तीन ते चार वर्षांपासून ही समस्या कायम आहे. रात्री-बेरात्री नळ येऊन गेल्यास मोठी पंचाईत होते. घरामध्ये पाण्याचा अन्य स्रोत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नागरिकांना होत असलेल्या असुविधेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लता म्हाला,गृहिणी.
हिवाळ्यातही वेळेवर मिळत नाही पाणी

^कॉलनीमध्येवेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. पहाटे वाजेपासूनच पाण्याची वाट पाहत जागरण करावे लागते. महिलांमध्ये असंतोष आहे. कमी दाबामुळे टाकीपर्यंत पाणी येत नाही. शोभाकाळे,गृहिणी.

नवीन पाइपलाइन टाकावी लागेल
^जुन्यापाइप लाइनवरून येथे पाणीपुरवठा होत आहे. लोकवस्ती वाढल्याने ही समस्या निर्माण होत आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकावी लागणार आहे. याबाबत अमृत योजनेत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता मजीप्रा.

पुढे काय?
मोठी नवीन पाइपलाइन टाकल्यास येथील नियमित पाणीपुरवठ्याची समस्या निकाली निघेल. ही समस्या निकाली निघावी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नवीन पाइपलाइन टाकण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अमृत योजनेतून ही पाइपलाइन प्रस्तावित करण्यात आली आहे.
तीन महिन्यांपासून कमी अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त देशपांडे ले-आऊटमधील महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या.