आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हासोबत पाणीटंचाईचेही चटके बसणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख काटेपूर्णा धरणात केवळ सध्या २४.०६ टक्के जलसाठा असल्यामुळे उन्हाळ्यात अकोलेकरांची पाण्यासाठी तडफड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत या प्रमुख धरणातील हा नीचांकी जलसाठा आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प वगळता अमरावती, वाशीम, बुलडाणा यवतमाळ या जिल्ह्यांतील जलसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे.
अमरावती विभागात असलेल्या एकूण ४६० प्रकल्पांमध्ये या वर्षी अल्पपावसामुळे जलसाठ्याची पातळी घसरली आहे. सर्वच प्रकल्पांमधील जलसाठा हा मागील पाच वर्षांच्या तुलनेत कमी असल्यामुळे विभागातील बुलडाणा अकोला जिल्ह्यांतील नागरिकांना पाण्याचे चटके बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावती विभागात असलेल्या नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी अरुणावती (जि. यवतमाळ) (२९.१६ टक्के), नळगंगा (३६.४१ टक्के) (जि. बुलडाणा) पेनटाकळी (३६.३२ टक्के) (जि. बुलडाणा) धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे.

वान(८४.४४ टक्के) (जि. अकोला) या दोन प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील या नऊ प्रकल्पांमध्ये सरासरी ६४.३० टक्के पाणी शिल्लक आहे. अल्प पावसामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी मोठ्या प्रकल्पातील जलसाठ्यात कमालीची घट दिसून आली आहे.

मोठ्या प्रकल्पांच्या तुलनेत मध्यम
प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा

अमरावती विभागात असलेल्या एकूण ४६० मोठे, मध्यम लघुप्रकल्पांपैकी मध्यम प्रकल्पांमध्ये तुलनेने समाधानकारक जलसाठा दिसून येत आहे. विभागातील बहुतांश प्रकल्पांमधून सध्या रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.
बुलडाणा अकोला जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत फक्त ३९ टक्केच
अकोलाजिल्ह्यातील निर्गुणा, मोर्णा उमा या प्रमुख तीन मध्यम प्रकल्पांमध्येही साठ्यात कमालाची घट दिसून येत आहे. यात सरासरी ३९.८६ टक्के पाणी शिल्लक आहे. त्याच प्रमाणे बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, पलढग, मस, कोराडी, मन, तोरणा उतावणी मध्यम प्रकल्पातही ३९.५३ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यातुलनेत वाशीम जिल्ह्यातील अडाण, सोनल, एकबुर्जी या प्रकल्पांमध्ये ५८.५२ टक्के, अमरावती जिल्ह्यातील शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन प्रकल्पामध्ये सरासरी ७९.८७ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यातील अधरपुस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोगराव, नवरगाव मध्यम प्रकल्पामध्ये सरासरी ८५.८५ टक्के जलसाठा आहे.