आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअरची समस्‍या, तीन महिन्यांपासून पाणी बिलाची प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - अचलपूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातील १५ ते १६ हजार नळधारक ग्राहकांना मागील तीन महिन्यांपासून पाणी बिल पाठवण्यात आले नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नियमित बिलाचा भरणा करणारे ग्राहक विचारणा करतात, तेव्हा त्यांना सर्व बिलाची रक्कम एकत्रच येईल असे सांगून परत पाठवले जात आहे. त्यामुळे नगरपालिकेला पैशांची आवश्यकता नाही काय, असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत आहेत.
अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अचलपूर शहरात साडेसात हजार तर परतवाडा शहरात हजार दोनशे अधिकृत नळधारक आहेत. त्यांना दर दोन महिन्यांचे बिल वितरीे करण्यात येते. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना बिल वितरीत केल्याने नगरपालिकेला महिन्याकाठी येणारी २५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्राप्त होऊ शकली नाही. एकीकडे नगरपालिकेत निधी नसल्याने विकास कामे होत नसल्याची तक्रार आहे, तर दुसरीकडे प्रशासन ग्राहकाकडून पाणी बिलाचा भरणा करून घेण्यासाठी उदासीन दिसत आहे.
शहरातील बिल वितरण व्यवस्थेचे काम खासगी कंपनीला प्रत्येक बिलामागे १.३० पैशाने वार्षिक ठेका देण्यात आला अाहे. मात्र नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून बिलच उपलब्ध करून देण्यात आल्याने बिलाचे वितरणच करण्यात आले नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून पाणीपुरवठ्याची जवळपास ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त वसुली थकीत आहे. ही गंभीर बाब असून याकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाखो रुपये खर्च होत असताना तीन महिन्यापांसून बिल केवळ मायनेट सॉफ्टवेअरच्या कनव्हर्शन प्रणालीच्या समस्येमुळे वितरीत करीत नसल्याची बाब खरोखरच लाजीरवाणी आहे. नगराध्यक्षांवर अिवश्वास प्रस्तावाचे धक्कातंत्र वापरणारे तर दुसरीकडे ते तितक्याच ताकदीने निष्फळ ठरवणारे दोन्ही गट याकडे लक्ष देतील काय? असा सवाल नागरिक करीत आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, समस्‍येबाबत इतर माहिती..