आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळवर घोंगावतेय पाणीटंचाईचे सावट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- गेल्याकाही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात शहरवासीयांपुढे पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात केवळ दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे लवकरच पाऊस आल्यास शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची पाळी येणार आहे.
शहरासह शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात राहणाऱ्या सुमारे अडीच लाख नागरिकांना जीवन प्राधिकरणाच्या वतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी निळोणा आणि चापडोह या दोन धरणांचा वापर करण्यात येतो. उन्हाळ्यापूर्वी या दोन्ही धरणात शहराला जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यातच जून महिन्यात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे निळोणा धरणातील पाण्याची पातळी तीन फूट वाढली होती. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारली आहे. पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या निळोणा धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा शहरवासीयांना आणि शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींना केवळ दोन महिन्यांपर्यंत पुरवता येणे शक्य असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अशा परिस्थितीत लवकरच पाऊस आल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरूप धरण करण्याची शक्यता आहे. धरणात असलेल्या पाणीसाठ्याचा योग्य वापर कसा करता येईल यासाठी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, लवकरच पाऊस आल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी चांगला पाऊस येईपर्यंत पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जीवन प्राधिकरणच्या वतीने करण्यात येत आहे.

पाण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न
झालेल्यापावसामुळे धरणातील पाण्याची पातळी तीन फूट वाढली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने ती खालावत आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.नागरिकांनीही पाऊस येईपर्यंत पाण्याचा जपून वापर करावा. शेषरावदारव्हेकर, उपअभियंता, जीवन प्राधिकरण.

पालिकेवर येणार मोठी जबाबदारी
पिण्याच्यापाण्याचा पुरवठा पाच दिवसांआड सुरू झाल्यास शहरातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावरही येण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती जास्त दिवस राहिल्यास पाणीपुरवठा करण्याची मोठी जबाबदारी पालिका प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे.

पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याची शक्यता
गेल्यापंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. अशीच परिस्थिती राहील्यास येत्या काही दिवसात दोन दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा चार किंवा पाच दिवसांआड करण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास पाण्याची समस्या आणखी बिकट होणार आहे.
शहरालगतच्या परिसरात परिस्थिती बिकट
शहरांपासूनकाही अंतरावर असलेल्या आणि ग्रामपंचायतीच्या भागात येणाऱ्या बऱ्याच परिसरात आतापासूनच परिस्थिती बिकट झाली आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांना आताही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाऊस लांबल्यास ही परिस्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे.