आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराचा पाणीपुरवठा आजपासून सुरळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्ववत शासन सेवेत सामावून घ्यावे, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी मजीप्राच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने सोमवारपासून (दि. ७) बेमुदत कामबंद केले होते. त्यामुळेच शहरात सोमवारी दुपारपासून पाणीपुरवठा बंद झाला होता. मात्र, मंगळवारी (दि. ८) सायंकाळी कृती समितीची मुख्यमंत्र्यासोबत चर्चा झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या तत्त्वत: मान्य केल्यामुळे संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून (दि. ९) पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

मजीप्राचे अधिकारी कर्मचारी यांच्या काही संघटना एकत्र आल्या त्यांनी राज्यव्यापी संयुक्त संघटना संघर्ष समिती स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून मागील दोन ते तीन महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले. मात्र, सरकारकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे सोमवारपासून (दि. ७) कामबंद आंदोलन पुकारले होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी कृती समितीचे पदाधिकारी, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, विभागाचे सचिव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपुरात भेट घेऊन चर्चा केली.

दरम्यान, मजीप्राच्या संयुक्त संघर्ष संघटनेच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनामुळे पाणीपुरवठासुद्धा बंद झाला होता. राज्यात ज्या ज्या ठिकाणी मजीप्राद्वारे पाणीपुरवठा केला जातो, त्या शहरात गावांना सोमवारपासून मजीप्राद्वारे वितरित केले जाणारे पाणी मिळाले नाही. सोमवारी सकाळी ज्या भागात पाणीपुरवठा झाला, त्या नागरिकांनी घरात बहुतांश पाण्याचा साठा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अनेकांकडे साठा करण्याची सोय नसल्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच शहरातील विविध भागांत पाण्यासाठी नागरिक हातपंप किंवा परिसरातील विहिरीवर आले होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत शहरात अनेक भागांत हे चित्र पाहायला मिळाले.

पाण्याचीझाली चोरी : सोमवारीसायंकाळपासून शहरात पाणीपुरवठा झाला नाही म्हणून शहरातील अनेक नागरिकांची मंगळवारी पाण्यासाठी पायपीट झाली. यातच नमुना भागात काही नागरिकांनी हातपंपावरून पाणी आणले टाक्यात भरून ठेवले. अशाच एका ठिकाणावरून टाक्यात असलेले पाणी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला.

मागण्यामान्य, संप मागे : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मागण्यांसंदर्भात जवळपास ४५ मिनिटे सविस्तर चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच सर्व समस्या मागण्या जाणून घेत त्या तत्त्वत: मान्य करण्यात येत असल्याबाबत सांगितले. तसेच अधिवेशन संपण्यापूर्वी त्या बाबतीत निर्णय करण्याचेही आश्वासन दिल्याचे संयुक्त संघटना संघर्ष समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांडगे, यांनी सांगितले.

पाणीपुरवठा सुरू होणार
संपमागेघेण्यात आला असून, मंगळवारी रात्रीपासूनच काम सुरू झाले आहे. जवळपास सर्वच केंद्रावर बुधवारी पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले काम सुरू झाले आहे. त्यामुळे बुधवारी नागरिकांना पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्यात येणार आहे. प्रशांत भामरे, कार्यकारीअभियंता, अमरावती. संपादरम्यान मंगळवारपर्यंत शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...