आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस चौकी कधी उघडणार ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजुराबाजार- सातहजार लोकसंख्येच्या गावाला परिसरातील २० ते २५ गावे जोडलेली आहेत. या गावांच्या सुरक्षेसाठी सन २००४ मध्ये निर्माण करण्यात आलेली पोलिस चौकी १० ते १२ दिवसांनंतर बंद झाली. ती आजतागायत बंदच आहे. ही पोलिस चौकी कधी उघडणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

गावातील भांडण-तंटे हे बहुतेक वेळा पोलिस ठाण्याच्या पायरीवरच शांत होत असतात. परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस चौकीची नितांत अावश्यकता असताना मात्र, ती गेल्या दहा-अकरा वर्षांपासून कायमच बंद असल्यामुळे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. सन २००४ मध्ये तत्कालीन ठाणेदार टी. एस. गेडाम यांच्या पुढाकाराने ही चौकी निर्माण करण्यात आली होती. इलेक्ट्रिक बोर्डाला लागून असलेल्या खोलीत ही चौकी आहे. ही खोली ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. तेथे फक्त ‘पोलिस चौकी’ नावाचा बोर्ड तेवढा कायम आहे. खाेली मात्र, अनेक वर्षांपासून बंदच आहे.

जेव्हापासून ही पोलिस चौकी बंद झाली आहे, तेव्हापासून परिसरामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावली असून अनेक असामाजिक घटना घडत आहेत. अवैध धंदेही सतत सुरूच आहेत.

या सर्वांना जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. कैक वर्षांपासून बंद असलेली राजुरा बाजारची पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
चौकीची नितांत गरज
गुन्हेगारांवरवचक राहतो. त्यासाठीच राजुराबाजार येथे पोलिस चौकी सुरू करण्याची नितांत आवश्यकता आहे. दिलीपपंतभोंडे, ग्रामस्थ.

पोलिस प्रशासनाने द्यावे गांभीर्याने लक्ष
गेल्याअनेक वर्षांपासून येथील पोलिस चौकी बंद आहे. ती का बंद ठेवली आहे, याचा उहापोह होणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासनाने यात लक्ष घालायला हवे. राहुलबनसोड, ग्रामस्थ
सुव्यवस्थेची गरज
आठवडीबाजाराच्या दिवशी येथे मोठी गर्दी असते. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस चौकीची गरज आहे. सुरेंद्रदोड, ग्रामस्थ.
गुन्हेगारीवर पोलिस वचक राहील
परिसरातीलअवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारीवर वचक राहील. बंद पोलिस चौकीमुळे गुन्हेगारांचे फावते. ही पोलिस चौकी त्वरित सुरू करण्यात यावी. राजेंद्रबोहरुपी, ग्रामस्थ.
उद््घाटनाच्या दिवसापासूनच बंद असलेली राजुराबाजारची पाेलिस चौकी.