आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टंटबाजी करताना चौघांना पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजापेठपोलिसांनी रविवारी दुपारी अमरावती ते बडनेरा मार्गावर चार दुचाकीस्वार स्टंटबाजांना स्टंटबाजी करताना पकडून ठाण्यात आणले. त्यांची चौकशी केली असता ते अट्टल घरफोडी करणारे असावेत, असा संशय पोलिसांच्या प्रथमदर्शनी चौकशीत पुढे येत आहे. या चौकडीकडे एक अालिशान कार दोन महागड्या दुचाकी आहेत, पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. तसेच कारच्या डिक्कीतून घरफोडी करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. रविवारी उशिरा रात्रीपर्यंत चौकशी सुरू होती.

राजापेठ पोलिसांनी रविवारी दुपारी चार स्टंटबाजांना ताब्यात घेतले. ते दोन दुचाकींवर होते. त्यांच्या दुचाकीची प्रत्येकी किंमत लाख ३५ हजारांच्या वर असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. यांच्याकडे असलेली एक अालिशान कारसुद्धा जप्त केली. कारच्या डिक्कीतून पोलिसांना लहान पान्यापासून ते मोठ्या पान्यापर्यंत सर्व प्रकारचे पाने, हातोडी, आरी, पाइप, लोखंडी टॉमी, स्क्रु ड्रायव्हर, पकड, चाकू यासह विविध प्रकारचे अवजार मिळून आलेत. या टोळीचा म्हाेरक्या हा १९ वर्षांचा असून, उर्वरित तिघे १४ ते १६ वर्षांच्या दरम्यान आहे.

असा झाला पदार्फाश
तीन दिवसांपूर्वी स्टंटबाजी करत असतानाच एक स्टंटबाज जखमी झाला होता. त्याची विचारपूस केली असता पोलिसांना या चाैकडीची माहिती मिळाली. त्यामुळे राजापेठ पोलिस यांच्या मागावर होतेच. दरम्यान, रविवारी दुपारी ही चौकडी मिळाली आणि त्यांचे कारनामे समोर येत आहे.
चौकडीला ताब्यात घेतल्यानंतर कारमधून जप्त केलेले साहित्य.