आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहितेला दुसऱ्या माळ्यावरून फेकले, दोन्ही पाय पाठीचे हाड झाले फ्रॅक्चर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती; एका २५ वर्षीय विवाहितेला माहेरून पैसे आणण्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी त्रास दिला. तिने पैसे आणण्यास नकार दिल्यामुळे पतीसह या मंडळींनी क्रूरतेचा कळस गाठून या विवाहितेला थेट दुसऱ्या माळ्यावरून खाली फेकून दिल्याचा आरोप जखमी विवाहितेने तक्रारीत केला आहे. ही घटना शहरातील फ्रेजरपुरा परिसरात पंधरा दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.
दुर्दाना तबसूम अ. रहील अहमद (२५, रा. चपराशीपुरा, अमरावती) असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. दुर्दाना यांनी दिलेल्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी दुर्दानाचा पती राहील वल्द इलीहास, सदीयानाज, नूसरतउल्ला खान, सैफा ताज सासू नसीमबानो यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. दुर्दाना यांचे माहेर नेरपरसोपंत आहे.

मे २०११ रोजी दुर्दाना यांचा विवाह झाला. राहील हा व्यवसायाने एम. आर. (मेडिकल रिप्रेझेंटिव्ह) आहे. या दाम्पत्याला इयाज (३) दियान (दीड वर्षे ) ही दोन मुले आहेत. दरम्यान २८ ऑगस्ट २०१५ ला दुर्दाना यांना पती कुटुंबातील इतर सदस्य सासू, ननंद यांनी पैशांसाठी हटकले. मात्र, वडिलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे आपण पैसे आणू शकत नसल्याची हतबलता दुर्दाना यांनी व्यक्त केली. या वेळी मात्र पतीसह इतरांनी कशाचाही विचार करता दुर्दाना यांना थेट घराच्या दुसऱ्या माळ्यावरून खाली फेकून दिले. या क्रूरतेमुळे दुर्दाना यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचे दोन्ही पाय तसेच पाठीचे हाड फ्रॅक्चर झाले. दुर्दाना यांना नागपुरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मागील पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा करण्यात आली. इतके होऊनही या प्रकाराबाबत वडिलांना किंवा पोलिसांत वाच्यता केली तर मारून टाकू, अशी धमकी सासरच्या मंडळींनी दिल्याचे दुर्दाना यांनी तक्रारीत म्हटले आहे. यामुळेच या महिलेने पंधरा दिवसांपासून ही आपबिती कोणालाही सांगितली नव्हती. अखेर शुक्रवारी एका चारचाकी वाहनातून ती फ्रेजरपुरा ठाण्यात आली. तिला चालता येत नाही. तिने ठाण्याबाहेर आलेल्या वाहनातूनच पोलिसांना तक्रार दिली.

जीवे मारण्याचा गुन्हा
पोलिसांनीया तक्रारीवरून पतीसह पाच जणांविरुद्ध मानसिक शारीरिक छळ, धमकी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली आहे. तपास एपीआय रोशन शिरसाठ करत आहे. गुन्हे दाखल असलेल्यांचा पोलिसांनी शोध सुरू आहे.