आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक सुबत्तेअभावी रखडणार का आता ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘स्मार्ट सिटी’मध्ये अमरावतीचा समावेश होणारच, या मुद्द्यावर प्रशासन ठाम असले तरी आर्थिक सुबत्तेअभावी हा प्रकल्प रखडणार की काय, असा संशय सत्ताधाऱ्यांच्या कंपूत निर्माण झाला आहे.

दरम्यान, सभागृह नेते बबलू शेखावत यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, असे होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यशाळेत केंद्र शासनाने स्मार्ट सिटीचे विविध बारकावे स्पष्ट केले गेले. महापौर चरणजीतकौर नंदा आयुक्त चंद्रकांत गुडेवार या कार्यशाळेला उपस्थित होते.

तेथील मांडणी समजून घेतल्यानंतर परतलेल्या या दोन्ही वरिष्ठांनी स्मार्ट िसटी साकारणारच, अशी घोषणा तर केली. परंतु; त्यासाठी लागणारे द्रव्यबळ खरेच विशिष्ट वेळेत जमा करता येईल का, याबाबत प्रशासनात संभ्रमावस्था आहे. त्याला कारणही तसेच आहे. दिल्लीतील कार्यशाळेनुसार मनपासमोर चार अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील पहिल्या अटीनुसार मनपाला दरवर्षी ५० कोटी रुपये स्वहिस्सा म्हणून पाच वर्षांच्या कालावधीसाठी खर्च करावयाचे आहे. मुळात मनपाची आर्थिक स्थिती जेमतेम असल्यामुळे या पहिल्याच अटीवर आपण मागे पडू, अशी सत्ताधाऱ्यांची शंका आहे. दुसरी अट तर त्याहूनही भयंकर आहे. या अटीनुसार मनपाला प्रत्येक वर्षी २०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे.

काय आहे स्मार्ट सिटी?
अमरावतीशहराला स्वच्छ, शाश्वत पर्यावरणपूरक बनवायचे, अशी स्मार्ट सिटीची संकल्पना आहे.दोनपैकी पहिल्या टप्प्यात राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी स्पर्धात्मक पद्धतीने दहा शहरांची निवड करावयाची आहे. तर निवड झालेल्या शहरांनी मार्गदर्शक सूचनांनुसार प्रस्ताव तयार करून तो आंतरराज्यीय स्तरावरील स्पर्धेत सादर करण्याचे कार्य दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होणार आहे.

राज्य सरकारने मदतीसाठी घ्यावा पुढाकार
'स्मार्टिसटी’मध्ये अमरावतीच्या समावेशाबाबत सरकारनेच घोषणा केली आहे.ऐनवेळी शासनाने कोट्यवधी रुपयांची जमवाजमव करण्याची अट पुढे केली आहे. महापालिकेची स्थिती लक्षात घेता हे शक्य नाही. त्यामुळे रकमेच्या जुळवणीत राज्य शासनाने मदत करावी, यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. बबलूशेखावत, सभागृहनेता, मनपा, अमरावती.
बातम्या आणखी आहेत...