आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाक्रमांकांच्या ११५ दुचाकी जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात मंगळसूत्र दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये अलिकडे वाढ झाली आहे. या चोऱ्यांमध्ये बहुतांश विनाक्रमांकाच्या दुचाकींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी बुधवारपासून शहरातील मार्गावरून धावणाऱ्या विनाक्रमांकाच्या सर्वच दुचाकींची धरपकड मोहीम राबवली. या अंतर्गत पहिल्याच दिवशी तब्बल ११५ दुचाकी जप्त केल्या.
काही दिवसांपासून धावत्या दुचाकीवर बसलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तसेच दुचाकी चोरीचेही प्रमाण वाढले. चोरट्यांनी वापरलेला चोरीचा नवा फंडा महिलांच्या जीवावर बेतणारा आहे. असे असले तरी मंगळसूत्र चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. यातही २६ जानेवारीला सायंकाळी वाजता गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील नवसारी ते जवाहरनगर मार्गावरून पतीसोबत दुचाकीने जात असलेल्या जोत्स्ना रवींद्र भुस्कडे (वय ४० रा. जवाहरनगर) यांच्या वाहनाचा पाठलाग करून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लंपास केले. यावेळी रवींद्र भुस्कडे यांनी काही अंतर या चोरट्यांच्या दुचाकीचा पाठलाग केला, मात्र ते आढळले नाही. चोरट्यांच्या पल्सर दुचाकीला क्रमांक नसल्याचे लक्षात आले. मंगळसूत्र चोरीची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला, मात्र तोपर्यंत चोरटे फरार झाले होते.
दरम्यान, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनीही मंगळवारी सायंकाळी गस्त घातली. शहरात सरासरी १०० मीटर अंतरावर किमान ते विनाक्रमांकाच्या दुचाकी धावताना दिसल्या. यामुळे चोरट्यांच्या दुचाकी कोणत्या, सर्वसामान्यांचा दुचाकी कोणत्या, हे ओळखणे कठीण झाले. त्यामुळे त्यांनी तातडीने निर्णय घेऊन बुधवारी सकाळपासून शहरातील सर्व पोलिसांना वाहतूक शाखेला विनाक्रमांक दुचाकी पकडण्याचे आदेश दिले. या दुचाकी जप्त करून वाहतूक कार्यालयात आणायच्या, जोपर्यंत वाहनचालक त्या दुचाकीवर क्रमांक टाकणार नाही, वाहनाचे कागदपत्र दाखवणार नाही, तोपर्यंत दुचाकी वाहतूक शाखेच्या कार्यालयात जप्त करून ठेवावी, अशा सूचना दिल्या.

पोलिस आयुक्तांच्या आदेशामुळे बुधवारी सकाळी वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी हे मुख्य मार्गांवर विनाक्रमांक दुचाकी पकडण्याची मोहीम राबवत होते. सकाळी १० ते आणि सायंकाळी ते यावेळेत मोहीम राबविण्यात आली. यामध्ये राजापेठ वाहतूक विभागाने ४३, गाडगेनगर विभागाने ३७ आणि फ्रेजरपुरा विभागाने २६ तसेच गाडगेनगर पोलिसांनी १० अशा एकूण ११५ दुचाकी जप्त केल्या होत्या. दुचाकी जप्त करून नो पार्कींग व्हॅनमधून वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणण्यात आल्या. दुचाकी मालकाने स्वत: हजर राहून वाहनाचे कागदपत्र सादर करायचे, तसेच क्रमांक त्याचठिकाणी टाकून दंड भरायचा दुचाकी सोडवायची, अशा पध्दतीने दुचाकी सोडवून घ्यायची. पोलिसांनी १०५ दुचाकी वाहतूक कार्यालयात आणून जमा केल्यामुळे त्या ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी सुध्दा जागा नव्हती. बुधवारी इर्विन चौकातील वाहतूक शाखेच्या कार्यालयात केवळ विनाक्रमांकाच्या दुचाकी दिसत होत्या. ही मोहीम आगामी काळातही अविरतपणे सुरू राहणार आहे. यावेळी काही वाहनचालकांनी जर एक किंवा दोन दिवसांपुर्वी वाहन खरेदी केले असेल तर त्या वाहनाला क्रमांक मिळालेला नसेल मात्र असे वाहनचालक जास्तीत जास्त ते टक्के आहेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. अशा वाहनचालकांना दंड आकारण्यापुर्वी आम्ही त्या क्रमांकाबाबत 'क्रॉस चेक' करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र अनेकांकडे क्रमांक आले असतानाही केवळ दुर्लक्षितपणा किंवा हेतुपुरस्सरपणे टाकने हेच प्रमाण अधिक आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे.

पार्किंगमधून जप्त होईल विनाक्रमांक दुचाकी : मार्गांवरूनधावणाऱ्या विनाक्रमांकाच्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत याशिवाय रेल्वे स्थानक, बसस्थानक किंवा शहरातील अन्य पार्कींगमध्ये ज्या दुचाकी विनाक्रमांक असतील, त्या दुचाकी पोलिस जप्त करणार आहे. जोपर्यंत दुचाकीवर क्रमांक टाकल्या जाणार नाही, तोपर्यंत दुचाकी जप्त ठेवण्यात असल्याचे पोलिस आयुक्तांनी यापूर्वीच सांगितले आहे. लवकरच पोलिस ही मोहीमसुध्दा राबवणार आहे.

१०५ दुचाकी जप्त
^राजापेठ,गाडगेनगर, फ्रेजरपुरा या तीन वाहतूक विभागात १०५ विनाक्रमांकाच्या दुचाकी जप्त केल्या. या वाहनांवर क्रमांक टाकून तसेच वाहनांचे कागदपत्र दाखवून आणि दंडाचा भरणा केल्यावर सोडून दिले. बळीराम डाखोरे, पोलिसनिरीक्षक, राजापेठ.

चार दिवसात क्रमांक दिला जातो
^दुचाकी विकत घेतल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर आम्ही ते दिवसांत वाहन चालकांना मोबाईलवर 'एसएमएस'द्वारेे क्रमांक पाठवतो. एखाद्यावेळी यापेक्षा जास्त वेळ क्रमांकासाठी होऊ शकतो. श्रीपाद वाडेकर, आरटीओ.

नागरिकांनी नियमानुसार क्रमांक टाकायला हवा
^वाहन विकत घेतल्यानंतर तातडीने वाहनावर क्रमांक टाकावा. तो क्रमांक नियमानुसारच टाकलेला असावा. तसे झाल्यास नागरिकांनाही त्रास होणार नाही आणि आम्हालाही सोईचे होईल. मोहिमेत ज्या चालकांच्या दुचाकींना आरटीओकडून क्रमांक प्राप्त झालेले नाहीत, अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी आम्ही पडताळणी करत आहोत. मात्र बहुतांश वाहनांना क्रमांक नाहीत. पाहणी केली असता १०० मीटर अंतरामध्ये ते विनाक्रमांकाच्या दुचाकी धावत होत्या. दत्तात्रय मंडलिक, पोलिसआयुक्त.

मंगळसूत्र चोर पकडा, चोप द्या आणि बक्षीस मिळवा
मंगळसूत्र चोरी झाल्यानंतर महिलांची अवस्था मन हेलावून टाकणारी असते. मंगळसूत्र चोर अजूनही पकडले गेले नाहीत. अशावेळी नागरिकांनी पुढाकार घेऊन मंगळसूत्र चेारट्यांना पकडावे, तसेच चोप द्यावा आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावे. मंगळसूत्र चोरट्याला पकडणाऱ्याला दोन हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. अशा आशयाचे फलक गाडगेनगर शिवसेना शाखेतर्फे मुख्य मार्गावर लावण्यात आले. जवाहरनगरची घटना ही आमच्या वार्डात झाली, घटनेनंतर आम्ही त्या महिलेची परिस्थिती पाहली. त्यामुळे आम्ही नागरिकांना हे आवाहन केले आहे. पोलिसांनी जरी मंगळसूत्र चोरटा पकडला तरी आम्ही बक्षिस देवू, असे नगरसेवक प्रदीप बाजड यांनी सांगितले.