आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांडग्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाचा अखेर मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरतालुक्यातील सारोळा कासार, अकोळनेर परिसरात नोव्हेंबरला पिसाळलेल्या लांडग्याने धुमाकूळ घालत सातजणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच वर्षांच्या तन्वीर शेख या मुलाचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला. वनविभागाकडून त्याच्या कुटुंबीयांना तत्काळ एक लाखाचा धनादेश देण्यात येणार आहे. उर्वरित सात लाख नंतर देण्यात येतील.
पिसाळलेल्या लांडग्याने नोव्हेंबरला सकाळी अकोळनेर परिसरात दिसेल त्या व्यक्तीवर प्राण्यावर हल्ला केला. प्रथम रावसाहेब सोनवणे या हल्ल्यात गंभर जखमी झाले. नंतर लांडग्याने आपला मोर्चा सारोळा कासारकडे वळवला. पाळीव जनावरे कुत्र्यांनाही या लांडग्याने चावे घेतले. या हल्ल्यात तन्वीर शेख, इंदूबाई घोडके, नामदेव धामणे, बानू शेख, तान्हुबाई खलाटे, भामाबाई कडूस हे गंभीर जखमी झाले. नंतर नागरिकांनी लांडग्याला यमसदनी धाडले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. तन्वीरच्या डोक्याला गंभीर जखमा असल्याने त्याला पुणे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याची प्रकृती सुधारली. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) अचानक तन्वीरची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच तनवीरचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच सरपंच रवींद्र कडूस, उपवनसंरक्षक गुलाब वळसे, सहायक वनसंरक्षक संजय कडू, वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे, वनपरिमंडळ अधिकारी राजेंद्र कांबळे, उत्तम पोतकुले यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन शेख कुटुंबीय गावकऱ्यांची भेट घेतली. ज्या जनावरांना लांडग्याने चावा घेतला होता, त्यांची प्रकृतीही खालावली असून काही जनावरे दगावल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भीतीचे वातावरण
^पिसाळलेल्या लांडग्याने पाळीव जनावरे, तसेच सहा ते सात जणांना चावा घेतला होता. त्यापैकी तन्वीरचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका गायीचाही मृत्यू झाला. शेख कुटुंबियांची आिर्थक परिस्थिती हलाखीची आहे. इतर जखमी व्यक्तींच्या चावा घेतलेल्या ठिकाणी सूज आहे. त्यामुळे त्यांनाही पुढील उपचारांसाठी रुग्णालयात आणण्यात येणार आहे.'' रवींद्र कडूस, सरपंच.

जखमींची तपासणी
^पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात जखमी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संबंधित कुटुंबाला लाखांची मदत वनविभागाकडून देण्यात येणार आहे. पैकी लाखाचा धनादेश तत्काळ देण्यात येणार असून उर्वरित लाख रूपयांची एफडी करण्यात येणार आहेत. या घटनेतील इतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात येणार आहे. '' गुलाब वळसे, उपवनसंरक्षक.