आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळसखेड येथून महिलेचे अपहरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर रेल्वे- येथून जवळच असलेल्या पळसखेड येथील २४ वर्षीय महिलेचे अपहरण झाल्याची तक्रार पतीने दाखल केली आहे. यावरून संशयित आरोपी म्हणून गावातील प्रकाश पाटील याला शनिवार, ११ जुलैला अटक करण्यात आली आहे.

पळसखेड येथील २४ वर्षीय विवाहित महिला २७ जून रोजी बचत गटाचे कर्ज घेण्यासाठी गावातील रिता राऊत या महिलेचा फोन आला आहे, असे सांगून घरून निघून गेली. यानंतर बरीच वाट पाहून पत्नी परत आल्याने महिलेचे पती अनंता जांभुळकर यांनी पत्नीचा शोध घेतला. शेवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.दरम्यान, पोलिसांनी २४ तास वाट पाहा, असे सांगितल्याचे ते म्हणाले. त्याच दरम्यान, रिता राऊत, प्रकाश पाटील अमोल काचेवार हे तिघेही गावात नसल्याचे जांभुळकर यांच्या लक्षात आले. या माहितीवरून पोलिसांनी शनिवार, ११ जुलैला प्रकाश पाटील याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडील तिकिटावरून पोलिसांनी त्याला बोलते केले. यावरून पाटील याने संबंधित महिलेला अहमदाबाद येथे नेल्याची माहिती पोलिसांना दिली.