आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री भ्रूण हत्येच्या मनोगताने पाणावले डोळे, काशीबाई अग्रवाल विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवदा - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येवदा येथील काशीबाई अग्रवाल विद्यालयात येथील पोलिस स्टेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्त्री भ्रूण हत्या या विषयावर विद्यालयाच्या विद्या्थिनी यशश्री देशमुख शितल बघेले यांच्या मनोगताने उपस्थितांचे डोळे पाणावले. 
 
मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करकण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी आर. टी. सवीकार, तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार नितीन चरडे, मनोज देशमुख यांची उपस्थिती लाभली होती. महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी दोनशे मीटर धाव स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटातून कल्पना शिरसाट, श्रुती रायबोले, शारदा कुथे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक पटकविला. माध्यमिक गटातून प्राची चौखंडे, गौरी मामनकर, नंदिनी देशमुख यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना स्मृति चिन्ह प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीळकंठ बोरोळे यांनी केले. कार्यक्रमाकरिता शशि भास्कर विजय क्रीडा मंडळ पोलिस स्टेशनचे सहकार्य लाभले. महिलांदिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम झाले. त्यात विद्यार्थिंनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 
 
बातम्या आणखी आहेत...