आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुण्‍या देवाची नव्‍हे ही आहे कॅमे-याची पालखी मिरवणूक, असे होते कॅमेरापूजन, पाहा PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शुक्रवारी जगभरात छायाचित्र दिन साजरा झाला. अमरावतीमध्‍ये दरवर्षी या दिवसाचे काहीसे भन्‍नाट आयोजन असते. एखाद्या दैवताप्रमाणे येथील छायाचित्रकार कॅमे-याचे पूजन करून ढोल-ताशांच्‍या गजरात जंगी मिरवणूक काढतात. शहर व जिल्ह्यातील छायाचित्रकार, स्‍थानिक राजकीय पुढारी मोठ्या हौशेने या कार्यक्रमात सहभागी होतात.
- अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर्स असोसिएशनने कॅमेरा दिंडी पालखीचे आयोजन केले.
- दिंडीचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते झाले.
- हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य यांनी कॅमे-याचे पूजन केले.
- जल संसाधन मंत्री राम शिंदे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव दलाल होते.
- मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीमध्ये कॅमेरा ठेऊन त्याचे पूजन करण्यात आले.
असा होता जल्‍लोष..
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा येथून सुरू झालेली पालखी शहराच्या विविध भागांतून मार्गक्रमण करीत निघाली. दिंडीदरम्यान शहरात ठिकठिकाणी रांगोळी घालून फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. या वेळी अरुण पवार, सचिन रासने, राजू पांडे, गुंजन गोळे, पवन शर्मा यांच्यासह गाविलगड प्रतिष्ठानाचे ढोल पथकाचे प्रमुख आकर्षण ठरले होते. दिंडीदरम्यान राजकमल चौक येथे दिंडीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला, तर जयस्तंभ चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करून राष्ट्रगीताने पालखीची सांगता करण्यात आली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अशा थाटात निघाली कॅमे-याची पालखी मिरवणूक..
बातम्या आणखी आहेत...